आजीने साडी नेसून केले कठीण 'ट्रेकिंग'

viral video 70 year old mountaineer महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

viral video 70 year old mountaineer
आजीने साडी नेसून केले कठीण 'ट्रेकिंग' 

थोडं पण कामाचं

  • आजीने साडी नेसून केले कठीण 'ट्रेकिंग'
  • तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने आजींनी केला 'ट्रेक'
  • आजींनी 'ट्रेक' पूर्ण करताच अनेकांनी वाजवल्या टाळ्या

नाशिक: महाराष्ट्रातल्या (Maharashtra) नाशिक (Nashik) जिल्ह्यातील एक व्हिडीओ व्हायरल (viral video) होत आहे. यात सत्तरीच्या घरात पोहोचलेल्या आजीबाई (grandmother) साडी नेसून अतिशय कठीण असे ट्रेकिंग (trekking) पूर्ण करताना दिसत आहेत. एक उभी (अंदाजे ८० अंशातली) चढण आजी सहज पार करतात. (viral video 70 year old mountaineer)

तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने आजींनी केला 'ट्रेक'

ज्या भागातून वर जायचे आहे तिथल्या अनेक पायऱ्या मोडतोड झाल्यामुळे वाईट अवस्थेत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. वरच्या दिशेने चढताना तोल गेला अथवा पाय घसरला तर कपाळमोक्ष होईल अशी परिस्थिती आहे. आसपास खडकाळ परिसर आहे. कातळ पायऱ्या असल्यामुळे किल्ल्यावर जाणे कठीण आहे. अशा ठिकाणी पाय ठेवून उभे राहणे आणि हळू हळू वरच्या दिशेने प्रवास करत किल्ल्यात प्रवेश करणे अवघड आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही टिकाव धरुन आजीबाई उत्साहाने एक एक पाऊल पुढे टाकतात. तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने त्या ट्रेक पूर्ण करतात आणि किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करतात. 

आजींनी 'ट्रेक' पूर्ण करताच अनेकांनी वाजवल्या टाळ्या

आजींनी ट्रेक (trek) यशस्वी केल्याचे बघून तिथे उपस्थित अनेक तरुण मनापासून टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करतात. विशेष म्हणजे आजी ट्रेकिंगमधील सर्वात कठीण भाग पार करत असताना जी सहजता दाखवतात ती पाहून अनेकांना आपल्या मोबाइलमध्ये (Mobile) या घटनेचा व्हिडीओ शूट करण्याचा मोह झालेला दिसतो. हा व्हिडीओ आजही अनेक ट्रेकर्सच्या (trekkers) सोशल मीडिया (Social Media) अकाउंटवर बघायला मिळतो.

नाशिकचा हरिहर किल्ला कठीण 'ट्रेक'मुळे प्रसिद्ध

आजी नाशिक जिल्ह्यातील हरिहर (Harihar Fort) या किल्ल्यावर ट्रेक करुन पोहोचल्या आहेत. नाशिक शहरापासून ४० किमी अंतरावर हा किल्ला आहे. गोंडा घाटातील व्यापाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. या किल्ल्याला हर्षगड या नावानेही ओळखले जाते. किल्ल्याच्या चौफेर कातळकडा आहे. अती प्राचीन असलेल्या या किल्ल्यातील अनेक दगडी पायऱ्या नैसर्गिक कारणांमुळे झिजल्या आहेत. त्यामुळे किल्ल्यावर जाणे कठीण झाले आहे. जेमतेम तासभरात फिरता येईल असा हा छोटा किल्ला आहे. पण या किल्ल्यावर जाण्याचा मार्ग नैसर्गिक कारणांमुळे कठीण झाल्यामुळे अनेक साहसी गिर्यारोहकांना (ट्रेकर) तो आकर्षित करतो. आजी अशाच ट्रेकरच्या गटासोबत किल्ल्यावर आल्याचे दिसते. 

ट्विटरवर आजींच्या ट्रेकिंगचे कौतुक, अनेकांनी बघितला व्हिडीओ

दिल्लीतील (Delhi) महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan) येथे कार्यरत असलेले माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक दयानंद कांबळे (Dayanand Kamble) यांनी आजींचा व्हिडीओ ट्विटरवर (Twitter) शेअर करत इच्छा तिथे मार्ग ही म्हण शब्दशः खरी ठरवणाऱ्या या माऊलीला सलाम असे नमूद केले आहे. उपसंचालक दयानंद कांबळे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला २० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. एका ट्विटर युझरने हा व्हिडीओ बघून वय ही फक्त संख्या आहे अशी प्रतिक्रिया दिली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी