बॅंकेचा कर्मचारी, ऑक्सिजन सिलिंडर लावून आला ड्युटीसाठी, बॅंक म्हणते चौकशी टाळण्यासाठी करतोय नाटक

व्हायरल झालं जी
Updated May 28, 2021 | 16:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

बोकारोच्या सेक्टर ४ मधील पंजाब नॅशनल बॅंकेच्या शाखेत ही घटना घडली आहे. बॅंक कर्मचाऱ्याची सुट्टी मंजूर झाली नाही, त्यामुळे तो कर्मचारी ऑक्सिजन सिलिंडर लावून बॅंकेच्या शाखेत पोचला.

Bank Employee reaches at Bank with oxygen cylinder
बॅंक कर्मचारी बॅंकेत पोचला ऑक्सिजन सिलिंडरसह  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • अरविंद कुमार यांचा व्हिडिओ व्हायरल
  • कोरोना झाल्यावरही सुट्टी मंजूर केली नाही असा बॅंक कर्मचाऱ्याचा आरोप
  • तर बॅंकेने सांगितली वस्तुस्थिती, आपल्याविरुद्ध सुरू असलेल्या थकित कर्ज प्रकरणातील चौकशीला थांबवण्यासाठी अरविंद कुमारचे नाटक

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (corona pandemic) देशभर रुग्णांची संख्या वाढते आहे. या संकटात अनेकांना ऑक्सिजन सिलिंडरची(Oxygen cylinder) गरज पडते आहे तर अनेकांना आपल्या नोकरीत नियमितता राखण्यासाठी कसरत करावी लागते आहे. नोकरदारांच्या या कसरतीचा असाच एक किस्सा घडलाय एका बॅंक कर्मचाऱ्याच्या (Bank Employee)बाबतीत. कोरोना संसर्गातून बरे होत असलेल्या एका बॅंक कर्मचाऱ्याची सुट्टी मंजूर झाली नाही, त्यामुळे तो कर्मचारी ऑक्सिजन सिलिंडर (Bank employee reaches bank with Oxygen cylinder) लावून बॅंकेच्या शाखेत पोचला. ही घटना आहे, झारखंडमधील औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बोकारो शहरातील (Bokaro, Jharkhand). बोकारोच्या सेक्टर ४ मधील पंजाब नॅशनल बॅंकेच्या शाखेत (PNB) ही घटना घडली आहे. अरविंद कुमार (Arvind Kumar) असे या बॅंक कर्मचाऱ्याचे नाव आहे. अरविंद कुमार यांच्याविरुद्ध सध्या विभागीय चौकशी सुरू आहे आणि लोन अकाउंटच्या थकित कर्जाच्या प्रकरणात कर्जवसूलीच्या प्रकरणात त्यांच्यावरील कारवाई थांबवण्यसाठी त्यांनी हे नाटक केले असल्याचे बॅंकेचे म्हणणे आहे. कोरोनातून बरे होत असताना अरविंद कुमार यांना कार्यालयात येण्याची सक्ती करण्यात आली आहे असे म्हणणे चुकीचे आहे.

(Viral Video : Bank Employee comes with oxygen cylinder in bank, PNB says it a drama to avoid enquiry in NPA case)

अरविंद कुमार यांचा व्हिडिओ व्हायरल


अरविंद कुमार ऑक्सिजन सिलिंड लाऊन आपली पत्नी आणि मुलासह मंगळवारी पंजाब नॅशनल बॅंकेच्या शाखेत पोचले होते. अरविंद कुमार यांच्या कुटुंबाने या प्रसंगाचा व्हिडिओ बनवला आणि ऑनलाईन पोस्ट केला. यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अरविंद कुमार ऑक्सिजन सिलिंडर लावून बॅंकेच्या शाखेत जाताना दिसत आहेत. पायऱ्या चढत ते एका अधिकाऱ्याच्या केबिनपर्यत पोचतात. तिथे अरविंद कुमार यांचे कुटुंब आणि बॅंकेच्या अधिकाऱ्यात जोरदार वादविवाद होतो. व्हिडिओच्या शेवटी ते बॅंकेच्या मॅनेजरला विचारतात की त्यांना त्रास दिला जातो आहे. तो म्हणतात की मी आजारी आहे आणि माझी परिस्थिती गंभीर आहे. अरविंद कुमार म्हणतात, डॉक्टरांनी सांगितले आहे की मला कोरोनातून पूर्ण बरे होण्यासाठी किमान तीन महिने लागतील कारण कोरोनाचा संसर्ग फुत्फुसापर्यत पोचला आहे. यानंतर अरविंद कुमार यांनी बॅंकेकडे पगाराची मागणी केली. अरविंद कुमार यांचा आरोप आहे की त्यांचे वेतन थांबवण्यात आले आहे.

अरविंद कुमारांचा आरोप


अरविंद कुमार यांच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी अरविंद कुमार यांची सुट्टी मंजूर केली नाही तर त्यांनी राजीनामा दिला होता, मात्र अरविंद कुमार यांचा राजीनामादेखील स्वीकारला गेला नाही. आता बॅंक अरविंद कुमार यांचा पगार कापण्याची धमकी देते आहे यामुळे त्यांना नाईलाजाने ऑक्सिजन सपोर्टवर कार्यालयात यावे लागले आहे. यानंतर अरविंद कुमार यांना घरी परत जाण्यास सांगण्यात आले.

बॅंकेने सांगितली वस्तुस्थिती


पंजाब नॅशनल बॅंकेने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, 'अरविंद कुमार यांनी हे नाटक आपल्या विरुद्ध सुरू असलेल्या चौकशीला थांबवण्यासाठी आणि एनपीए लोन अकाउंट्समधील वसूलीची कारवाई थांबवण्यासाठी केले आहे. यामध्येदेखील हा दावा करण्यात आला आहे की अरविंद कुमार हे मॅनेजर पदावर आहेत आणि त्यांनी राजीनामा दिला आहे. मात्र विभागीय चौकशी सुरू असल्यामुळे त्याचा स्वीकार करण्यात आलेला नाही. याशिवाय अरविंद कुमार विनापरवानगी दोन वर्षापासून अधिक काळासाठी बॅंकेत अनुपस्थित आहेत.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी