Viral Video : मुंबई : हत्ती हा प्राणी तसा शांत असतो, पण तो चिडला की झालंच. असे असले तरी कधी कधी हत्ती माणासांपेक्षा जास्त समजुतरपणानेही वागतो. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही मुलं हत्तीच्या कळपांसमोर फोटो काढत होते. तेव्हा हत्तींनी त्यांना चांगलाच हिसका दाखवला आणि त्यांना पळवून लावले. आयएएस आधिकारी सुप्रिया साहू यांनी आपल्या ट्विटवर अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. साहू यांनी व्हिडीओ पोस्ट करून सांगितले आहे की जंगलातल्या प्राण्यांसोबत सेल्फी घेणे किती घातक असू शकतं असे म्हटले आहे. हे लोक नशीबवान होते कारण हत्तींनी त्यांना माफ केले आहे. अन्यथा हत्तींनी त्यांना चांगलाच धडा शिकवला असता असेही साहू यांनी म्हटले आहे.
५६ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. त्यात हत्तीचा एक कळप आपल्या रस्त्याने जात आहे. तेव्हा या हत्तींचा कळप पाहून चालकांनी आपली गाडी फिरवली. परंतु काही अतिउत्साही तरुण हत्तींपासून दूर जाण्याऐवजी फोटोसेशन करत होते. एक तरुण रस्त्यात उभा राहून मित्राला फोटो काढण्यास सांगत आहे. सेल्फी आणि फोटो घेतल्यानंतरही हे तरुण तिथेच उभे होते. तेव्हा हत्तींनी या तरुणांकडे आपली मोर्चा वळवला. तेव्हा हे तरुण घाबरले आणि त्यांनी पळ काढला. तेव्हा हत्तीही मागे फिरले आणि जंगलात निघून गेले. हत्तींनी कुणालाही इजा पोहोचवली नाही.
Selfie craze with wildlife can be deadly. These people were simply lucky that these gentle giants chose to pardon their behaviour. Otherwise, it does not take much for mighty elephants to teach people a lesson. video-shared pic.twitter.com/tdxxIDlA03 — Supriya Sahu IAS (@supriyasahuias) August 6, 2022
या व्हिडीओला आतापर्यंत ६७ हजार व्ह्युज मिळाले आहेत तर २ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो नेटकर्यांनी कमेंटमधून आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे तरुण किती मुर्ख आहेत, थोडक्यात बचावले असे कमेंटमध्ये युजर म्हणाले आहेत. तसेच लाईक्स आणि व्ह्युजसाठी लोक आपला जीव धोक्यात घालतात असेही म्हटले आहे. काही युजर्सनी हा व्हिडीओ चार महिने जुना असल्याचेही म्हटले आहे.
अधिक वाचा : Optical Illusion: दगडांमधे बसला आहे एक पक्षी, तुम्ही दाखवा शोधून, ९९ टक्के लोक झाले फेल