BSF Jawan Push Ups Viral Video: नवी दिल्ली : संपूर्ण देशात कोरोनाची तिसरी लाट आली असताना थंडीचीही लाट पसरली आहे. मुंबई महाराष्ट्रातही पारा चांगलाच खाली आला आहे. अशावेळी देशातले थंडीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. असाच बीएसफ जवानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही दंग झाले आहेत. या व्हिडीओत एक बीएसफ जवान हाडं गोठवण्यार्या थंडीत पुशअप मारत आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ ट्रेंड होत असून या जवानाची चौफेर प्रशंसा होत आहे. (Viral Video BSF jawan completes 47 push ups within 40 seconds in freezing weather Watch Viral Video)
40 seconds. 47 push ups. — BSF (@BSF_India) January 22, 2022
Bring it ON.#FitIndiaChallenge@FitIndiaOff@IndiaSports
@@PIBHomeAffairs pic.twitter.com/dXWDxGh3K6
बीएसफने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट केल आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे. ४० सेकंदात ४७ पुश अप्स. व्हिडीओत दिसत आहे. संपूर्ण परिसर बर्फाने अच्छादलेला आहे. या बर्फवृष्टीत जवान पुशअप मारत आहे. जवानाची ऊर्जा आणी इच्छाशक्ती पाहून नेटकर्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अशा बर्फवृष्टीत सामन्य माणसं अडकतात, बाहेर पडण्यास त्यांना अडचण होते. अशा बर्फात जवान पुशअप मारत होता.
असाच एका जवानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक जवान बर्फवृष्टीत एका हाताने पुशअप मारत आहे. हे दोन्ही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्युज मिळाले असून नेटकर्यांनी जवानांची प्रशंसा केली आहे.
One Handed Push Ups. — BSF (@BSF_India) January 23, 2022
How many can YOU?
Bring it ON.#FitIndiaChallenge@FitIndiaOff@IndiaSports@PIBHomeAffairs https://t.co/HxadaZ3CcH pic.twitter.com/pcRwl2kTks