Viral Video : चिमुरड्याने जबड्यात घातला हात आणि सिंहिणीचे मोजले सारे दात

viral video child put his hand in the jaw and counted all the teeth of the lion : धाडस करणारी माणसं पण कधी कधी घाबरून जाताना दिसतात. या उलट लहान मुलं बेधडकपणे कोणीतीही कृती सहजरित्या करतात. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश दिसत नाही. अशीच एक घटना अलिकडेच घडली.

viral video child put his hand in the jaw and counted all the teeth of the lion
Viral Video : चिमुरड्याने जबड्यात घातला हात आणि सिंहिणीचे मोजले सारे दात  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Viral Video : चिमुरड्याने जबड्यात घातला हात आणि सिंहिणीचे मोजले सारे दात
  • घटनेचा व्हिडीओ व्हायरल
  • अनेकांनी हा व्हिडीओ बघून लाइक आणि शेअर केला

viral video child put his hand in the jaw and counted all the teeth of the lion : धाडस करणारी माणसं पण कधी कधी घाबरून जाताना दिसतात. या उलट लहान मुलं बेधडकपणे कोणीतीही कृती सहजरित्या करतात. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश दिसत नाही. अशीच एक घटना अलिकडेच घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ बघून लाइक आणि शेअर केला आहे. व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. हा व्हिडीओ @gir_lions_lover या इन्स्टाग्राम अकाउंटवर आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by (@gir_lions_lover)

व्हिडीओत एका पिंजऱ्यात दोन सिंहिणी दिसत आहेत. या सिंहिणींच्या भेटीसाठी एक चिमुरडा पिवळ्या रंगाचा टी शर्ट घालून आल्याचे दिसते. मित्र मैत्रीणींना भेटावे इतक्या सहजतेने मुलगा सिंहिणींना भेटतो. 

मुलगा हाताने सिंहिणींना मायेने स्पर्श करतो, त्यांना कुरवाळतो. एरवी कोणीही जंगली जनावरांच्या आसपास जाण्याची पण हिंमत करत नाही. पण व्हिडीओत दिसणारा मुलगा बेधडकपणे सिंहिणीच्या जबड्याला स्पर्श करतो. सिंहिणीच्या जबड्यात हात घालून तिचे दात मोजताना दिसतो. ही कृती तो अतिशय सहजतेने करतो. हे करताना त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश दिसत नाही. विशेष म्हणजे पिंजऱ्यात चिमुरडा आला असताना दोन्ही सिंहिणी अतिशय शांत दिसतात. त्यांना मानवी उपस्थितीमुळे अस्वस्थ वाटत नाही. चिमुरडा एका सिंहिणीच्या जबड्यात हात घालतो त्यावेळी ती सिंहिण आणि तिच्या जवळच असलेली दुसरी सिंहिण यापैकी कोणीही विरोध करत नाही. 

बापरे, तिखट खाल्ल्यामुळे शिंक येऊन तुटल्या 4 बरगड्या

VIRAL VIDEO: टॉवेल गुंडाळून थेट शिरला मेट्रोत आणि केलं असं काही की....

चिमुरड्याच्या धाडसी कृतीचा व्हिडीओ बघून अनेकजण चक्रावले आहेत. हे कसे शक्य आहे, असा प्रश्न काही जणांना सतवत आहे. तर काहींच्या मते चिमुरड्याच्या घरच्यांनी सिंहिणी पाळल्या असाव्यात.... पाळलेले प्राणी असले तरी जंगली जनावरांच्या जबड्यात हात टाकून दात मोजण्याची हिंमत कोणी करत नाही. चिमुरड्याने मात्र ही कृती बेधडकपणे केली आहे. यामुळे चिमुरड्याच्या धाडसाचे कौतुक होत आहे. तर काही जण असे वेडगळ धाडस करणे चुकीचे आणि धोक्याचे असल्याचे मत व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी