कोरोनाची भीती, टॉयलेट पेपरवरून महिलांमध्ये हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated Mar 12, 2020 | 19:49 IST | टाइम्स नाऊ हिंदी

संपूर्ण जगात सध्या कोरोना व्हायरसची भीती पसरली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे लोक स्वच्छतेकडे पूर्वी पेक्षा अधिक लक्ष देऊ लागले आहेत. त्याबाबतीतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

viral video coronavirus effect three ladies fight for toilet paper
Video: कोरोनाची भीती, टॉयलेट पेपरवरून महिलांमध्ये हाणामारी  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • कोरोना व्हायरसचा प्रभाव, ऑस्ट्रेलियात टॉयलेट पेपर, हँडवॉशची कमतरता
  • सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल, टॉयलेट पेपरसाठी तीन महिलांमध्ये हाणामारी
  • भांडणाची तक्रार पोलिसांमध्ये, पोलिसांनी जारी केला समन्स

नवी दिल्ली: संपूर्ण जगात कोरोना व्हायरसची दहशत पसरलीय. चीनमध्ये तीन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू या व्हायरसमुळे झालाय आणि ९०हून अधिक देशांमध्ये याचा प्रभाव बघायला मिळतोय. भारतात आतापर्यंत ७३ प्रकरणं समोर आले आहेत. कोरोनाच्या दहशतीमुळे देशांमध्ये सॅनिटायझर, मास्क आणि टॉयलेट पेपरची कमतरता भासू लागली आहे. सोशल मीडियावर याबाबतीतच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियाच्या सिडनी इथला आहे. जिथं सुपर मार्केटमध्ये टॉयलेट पेपरसाठी दोन महिलांमध्ये हाणामारी होतेय. पोलिसांनी याप्रकरणी २३ आणि ६० वर्षीय अशा दोन महिलांना आरोपी बनवलं आहे आणि त्यांना समन्स जारी करण्यात आलाय. टॉयलेट पेपरसाठी झालेल्या या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकांना मारहाण करत आहेत. व्हिडिओमध्ये तीन महिला एकमेकांसोबत भांडत आहेत आणि त्यांच्यामध्ये स्टोर मॅनेजर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतोय. भांडण थांबलं नाही म्हणून स्टोर मॅनेजरनं पोलिसांना बोलावलं.

पोलिसांनी याप्रकरणी आपलं वक्तव्य दिलंय. त्यांनी सांगितलं की, आतापर्यंत कुणालाही अटक केली गेली नाहीय. आपल्याला माहितीच आहे की, ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना व्हायरसची दहशत खूप पसरली आहे. लोकं स्वच्छतेसाठी अधिक जागरूक झाले आहेत. त्यामुळेच टॉयलेट पेपर खरेदी करण्यासाठी झुंबड उडालीय. टॉयलेट पेपरच्या कमतरतेमुळे सरकारनं आता त्याच्या खरेदीची एक सीमा निश्चित केलीय.

इटलीमध्ये सुद्धा कोरोना व्हायरसचा प्रसार थांबविण्यासाठी कडक पावलं उचलली जात आहेत. बुधवारी औषधं आणि खाण्या-पिण्याची दुकानं सोडून सर्व दुकानं बंद करण्यात आली. देशात दोन आठवड्यांमध्ये कोरोना व्हायरसमुळे ८२७ लोकांचा मृत्यू झालाय. इटलीमध्ये अनेक प्रकारच्या बंदी घालण्यात आल्या आहेत. यात सार्वजनिक रुपात एकत्र येण्यावर बंदी आणि प्रवासावरही बंदी घालण्यात आलीय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...