तरुणीनं केलं असं काही की अनेकांनी केलं कौतुक

Viral Video Desi girl performs belly dance on Manike Mage Hithe श्रीलंकेतील गायिका योहानी दिलोका डी सिल्वा (Sri Lankan singer Yohani Diloka De Silva) हिच्या मणिके मगे हिते (Manike Mage Hithe) या लोकप्रिय सिंहली गाण्यावर ताल धरुन बेली डान्स करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Viral Video Desi girl performs belly dance on Manike Mage Hithe
तरुणीनं केलं असं काही की अनेकांनी केलं कौतुक 
थोडं पण कामाचं
  • तरुणीनं केलं असं काही की अनेकांनी केलं कौतुक
  • व्हिडीओ झाला व्हायरल
  • अद्भूत, शानदार, सुंदर, अप्रतिम अशा शब्दांत अनेकांनी केलं कौतुक

Viral Video Desi girl performs belly dance on Manike Mage Hithe कोलंबो: श्रीलंकेतील गायिका योहानी दिलोका डी सिल्वा (Sri Lankan singer Yohani Diloka De Silva) हिच्या मणिके मगे हिते (Manike Mage Hithe) या लोकप्रिय सिंहली गाण्यावर ताल धरुन बेली डान्स करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

योहानी दिलोका डी सिल्वा हिने मणिके मगे हिते हे गाणे मे महिन्यात यू ट्युबवर अपलोड केले होते. हे गाणे अल्पावधीत व्हायरल झाले. यानंतर याच गाण्यावर ताल धरुन बेली डान्स केल्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ दीपाली वशिष्ठ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड झाला आहे. व्हिडीओ अपलोड करुन 'या गाण्याने मला ठेका धरायला भाग पाडले' अशा स्वरुपाची कॅप्शन देण्यात आली आहे. अल्पावधीत हजारो लोकांनी हा व्हिडीओ बघून बेली डान्स करणाऱ्या तरुणीचे कौतुक केले आहे. अनेकांनी हा व्हिडीओ स्वतःच्या अकाउंटवरुन शेअर करायला सुरुवात केली आहे. अद्भूत, शानदार, सुंदर, अप्रतिम अशा शब्दांत अनेकांनी बेली डान्स करणाऱ्या तरुणीचे कौतुक केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी