Viral Video: शार्कला पाहताच कुत्र्याची समुद्रात उडी

व्हायरल झालं जी
Updated Nov 18, 2020 | 21:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये शार्कला पाहिल्यावर कुत्रा समुद्रात उडी मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियामधील आहे.

Viral Video
व्हायरल व्हिडिओ  

थोडं पण कामाचं

  • एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये शार्कला पाहताच कुत्रा समुद्रात उडी मारताना दिसत आहे
  • व्हिडिओ ऑस्ट्रेलियाच्या नॉर्थ क्वीन्सलँडमधील हेजर्स्टोन बेटावरील आहे

नवी दिल्ली : सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये शार्क पाहिल्यावर कुत्रा समुद्रात उडी मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियामधील आहे, समुद्रात शार्क दिसल्यावर त्याला मारण्यासाठी कुत्रा अचानक समुद्रात उडी मारतो, पण शार्क तिथून लगेच निसटतो.

ऑस्ट्रेलियामधील व्हिडिओ 

व्हिडिओ ऑस्ट्रेलियाच्या नॉर्थ क्वीन्सलँडमधील हेजर्स्टोन बेटावरील आहे ज्यात तिली नावाचा कुत्रा लक्झरी रिसॉर्टमध्ये शार्कला घाबरवण्यासाठी पाण्यात उडी मारताना दिसला. वास्तविक धोकादायक शार्क मासा समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचला. तिलीची नजर त्याच्यावर पडताच त्याने काही सेकंदात पाण्यात उडी मारली, पण शार्क तेथून निसटला.

शार्क पाहून कुत्र्याने नदीत उडी मारली

यानंतरही, तिली नावाचा कुत्रा बराच काळ समुद्रात राहिला, कदाचित त्याला पुन्हा एकदा शार्क पकडण्याची संधी मिळेल असे वाटले होते पण तसे होऊ शकले नाही. यावेळी दूरच्या रिसॉर्टमध्ये उभे असलेले लोक या दृश्याचा आनंद लुटत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये जलद व्हायरल होत आहे. व्हिडिओ "बॅक टू बॅक अ‍ॅडव्हेंचर्स" नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर केला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाला

हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. शार्क मासा हा खूप धोकादायक असतो. पाण्याखाली शार्क मासा कुणाचीही शिकार करू शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी