[VIDEO] स्विमिंग पूलमध्ये बुडणाऱ्या तरुणीला कुत्र्याने वाचवलं, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क 

व्हायरल झालं जी
Updated Aug 23, 2019 | 16:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा स्विमिंग पूलमध्ये बुडणाऱ्या तरुणीला वाचवत असल्याचं पाहायला मिळतं आहे. 

girl save
[VIDEO]स्विमिंग पूलमध्ये बुडणाऱ्या तरुणीला कुत्र्याने वाचवलं  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • कुत्र्याने स्विमिंग पूलमध्ये उडी मारुन वाचवला तरुणीचा जीव
  • केस तोंडात पकडून तरुणीला काढलं पूलबाहेर
  • व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज

मुंबई: Dog jump into pool to save girl: कुत्रा हा आपल्या मालकाबाबत नेहमीच प्रामाणिक असतो असं कायम म्हटलं जातं. जनावरांमध्ये कुत्रा हा सर्वाधिक समजदार प्राणी समजला जातो. कारण कुत्रा हा नेहमीच आपल्या मालकाची रक्षा करतो. याच्याशीच निगडीत एक बातमी आम्ही आपल्याला सांगणार आहोत. एक अशी घटना घडली की ती पाहून तुम्ही देखील कुत्र्याच्या शूरपणाचं कौतुक कराल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ फारच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक जर्मन शेपर्ड जातीचा कुत्रा हा एका तरुणीला वाचविण्यासाठी थेट स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो. पण फक्त एवढंच नव्हे तर आपल्या डोक्यातील कल्पना वापरत तरुणीचा जीवही वाचवतो. 

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकत की जेव्हा तरुणी स्विमिंग पूलमध्ये बुडत असल्याचं कुत्र्याने पाहिलं तशी त्याने थेट पूलमध्येच उडी घेतली. त्यानंतर या कुत्र्याने तरुणीच्या केसाला तोंडात पकडून तिला खेचत खेचत पूलच्या बाहेर आणलं. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ अतिशय वेगाने व्हायरल होता आहे. 

व्हिडिओ पाहून आपण या बहादूर कुत्र्यांच नक्कीच कौतुक कराल. व्हिडिओतील या कुत्र्याने स्पष्ट केलं आहे की, त्याला आपल्या मालकाविषयी किती प्रेम आहे ते. कारण तरुणीचा जीव वाचविण्यासाठी कुत्र्याने आपल्या जीवाची पर्वा न करता थेट पाण्यात उडी घेतली. त्यामुळे हा व्हिडिओ आता अनेक जण पसंत करत आहेत. 

हा व्हिडिओ अँड्रयू अल्बर्ट नावाच्या एका व्यक्तीने शेअर केला आहे. एवढंच नव्हे तर हा व्हिडिओ बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांनी देखील या कुत्र्याचं कौतुक केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या २५ सेकंदाच्या व्हिडिओला आतापर्यंत १.५३ मिलियन लोकांनी पाहिलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ९.८ K एवढे लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांकडून आता शेअर केला जात आहे. कुत्र्याने ज्या प्रकारे तरुणीला बुडण्यापासून वाचवलं आहे ते पाहून तुम्ही देखील थक्क होऊन जाल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...