Viral Video: नवऱ्यानो! बायकांना चुकूनही बघू देऊ नका हा व्हिडिओ ; नवऱ्याची नशा उतरवणारा व्हिडिओ पाहून येईल हसू

Today Viral Video:या व्हायरल व्हिडिओमध्ये हे जोडपे वाहत्या पाण्यात असल्याचे दिसून येत आहे. झाडाचे पानं मारल्यावर त्या व्यक्ती त्याची पत्नी पाण्यात बुडवते. ही प्रक्रियेची वारंवार पुनरावृत्ती करते, असे दिसते की ती तिच्या पतीचे नशा सोडवत आहे.

The wife's new intoxication has come down like this, you will smile after seeing the video
पत्नीने नवऱ्याची अशी उतरवली नशा, Video पाहून येईल हसू   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • El Chikiने आपल्या ट्विटर हँण्डलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
  • या व्हिडिओला आतापर्यंत 56 हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
  • व्यसन सोडविण्यासाठी पत्नीचा अजब उपाय.

Viral On Internet: नवऱ्याला दारूचे व्यसन असेल तर ते सोडविण्यासाठी पत्नी अनेक प्रयत्न करत असते. डॉक्टरचे औषध, बाबा लोकांची दवा दारू काय नाही ते प्रयत्न पत्नी करत असते. तरीही नवऱ्या लोकांचं व्यसन हे सुटता सुटत नाही. पण वाचक मंडळींनो जर तुम्हालाही कोणतं व्यसन असेल तर ते स्वत:च्या मर्जीने सोडत असाल तर सोडून टाका, नाहीतर पत्नीने ते व्यसन सोडवण्याचं मनात घेतलं तर तुमचं काही खरं नाही. कारण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात पतीचं व्यसन सोडवताना बायकोनं केलेलं कृत्य पाहून तुम्हाला हसू येईल पण ही स्थिती तुमच्यावर आली तर तुम्हाला देव आठवेल.  (Viral Video:  Don't let women watch this video by mistake;wife Teach Lesson To Husband leave addiction )

अधिक वाचा  : लग्नासाठी पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे?

El Chikiने आपल्या ट्विटर हँण्डलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.  यातील महिलेला नवऱ्याचं व्यसन सोडवायचं आहे. व्यसन सोडविण्यासाठी पत्नीने केलेली कृती पाहून अनेक नेटकऱ्यांना हसू आलं. परंतु बिचारा नवरोबाला मात्र त्याची नानी आठवली असेल हे मात्र नक्की. जर हा व्हिडिओ महिलांच्या हाती लागला तर ते आपल्या पतीचे व्यसन अशा प्रकारे सोडवू शकतील. या व्हिडिओला आतापर्यंत 56 हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर एक हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. 

अधिक वाचा  : Valentine डेला असं व्यक्त करा आपलं प्रेम, नक्कीच उत्तर येईल हो

व्यसन अशा पद्धतीने सोडवलं जात असेल तर बापा जन्मी व्यसन केलेलं नको असा विचार अनेकांच्या मनात येईल. ज्यांना आपल्या नवऱ्याचं व्यसन उतरावयचे असेल तर त्यांनी हा व्हिडिओ एकदा पाहून घ्यावा. या व्हिडिओमध्ये एक महिला आणि एक माणूस दिसत आहे. ते दोघेही नवरा-बायको असल्याचं सांगण्यात येत असून नवऱ्याला व्यसन असल्याचं सांगण्यात येत आहे. आपल्या नवऱ्याला असलेलं व्यसन सोडविण्यासाठी या व्हिडिओमधील महिलेनं एक जबरदस्त उपाय शोधून काढला आहे. नवऱ्याचं व्यसन सोडविण्यासाठी पत्नीने त्याला वाहत्या पाण्यात बसवलं. तिने हातात झाडाचे पानं घेतली आहेत. 

अधिक वाचा  : जया किशोरीची Top 5 भजन, ज्यांना मिळालेत कोट्यवधीमध्ये व्ह्यूज

पाण्यात बसलेल्या नवऱ्याला त्या पानाने फटके देते आणि त्याला पाण्यात बुडवते, असं दोन- तीनदा करते. नाक तोंड बंद न करता वाहत्या पाण्यात पूर्ण ताकदीने बुडवल्यानंतर व्हिडिओतील नवऱ्याचं व्यसन छु मंतर झालं असेल, यात शंका नाही.

व्यसन सोडविण्यासाठी पत्नीचा हा उपाय पाहून व्हिडिओतील पती पुन्हा व्यसन करण्याचं धाडसं करणार नाही. परंतु हा व्हिडिओ पाहून इतर लोकांचीही चिंता वाढली असेल. जर हा व्हिडिओ त्यांच्या पत्नीच्या हातात पडला तर त्यांचेही असेच हाल होतील. यामुळे तेही व्यसन दूर राहतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी