नवरदेवाने नवरीऐवजी मेव्हणीला घातली वरमाला, मग काय धू-धू धुतला...

Bride Groom Viral Video: वधू-वराचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला तुमचं हसू रोखता येणार नाही.

viral video drunk groom gave garland to sister instead of bride girl beating groom
नवरदेवाने नवरीऐवजी मेव्हणीला घातली वरमाला, मग काय धू-धू धुतला... 
थोडं पण कामाचं
  • नशेत नवऱ्याने केले विचित्र कृत्य
  • वधूच्या जागी मेव्हणीलाचा घातली वरमाला
  • मेव्हणी बहिणीच्या नवऱ्याला सगळ्यांसमक्ष चोपलं

Bride Groom Viral Video: नशा ही वाईट सवय आहे अशी एक जुनी म्हण आहे. कारण, अनेक वेळा नशेत लोक अशी कृत्ये करतात की ज्यामुळे इतरांना खूप त्रास होतो. एवढेच नाही तर कधी-कधी यामुळे अशा काही गोष्टी घडतात की, ज्याची जगभर चर्चा होते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका नवऱ्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत वधूऐवजी चक्क मेव्हणीलाच हार घातला. (Bride Groom Viral Video) या प्रकाराने भडकलेल्या मेव्हणी बाईनेही मग जोरदार गोंधळ घातला आणि नवरदेवाची यथेच्छ धुलाई केली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून लोकही हैराण झाले आहेत आणि ते प्रचंड हसत आहेत.

लग्नांमधीस काही खूप मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे आपलं बरंच मनोरंजन देखील होतं. त्याच वेळी, काही व्हिडिओंवर विश्वास ठेवणे कठीण होतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

अधिक वाचा: Naag Nagin Love Video: नाग नागिणीची प्रणयदृष्ये कॅमेर्‍यात कैद, व्हिडीओ व्हायरल

ज्यामध्ये एक नवरदेव नशेत विचित्र कृत्य करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वराला स्टेजवर त्याच्या पायावर उभे राहताही येत नाही. एक माणूस हात धरून त्याला उभा करतो. दुसरीकडे लग्नाचे विधी केले जात आहेत. तेथे वराला नशेत असल्याचे उपस्थित लोकांना समजते. याचवेळी, नवरदेव वधूऐवजी आपल्या मेहुणीच्याच गळ्यात वरमाला घालतो आणि त्यामुळे मंडपात प्रचंड गोंधळ होतो. पाहा व्हिडिओ.

व्हिडिओ पाहून हसू थांबणार नाही...

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलत की मेव्हणीबाई नवरदेवाची कशी धुलाई करतेय ते. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्विटरवर '@S0niya_51' नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

अधिक वाचा: Baba Vanga: खऱ्या होतायत बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या, जगाचा सर्वनाश होणारी भविष्यवाणीही ठरेल का खरी?

हा व्हिडिओ आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला साडे आठ हजार अधिक लोकांनी लाइक केले आहे. तर दोन हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे.हा व्हिडिओवर लोक खूप एन्जॉय करत आहेत. काही यूजर्सचं म्हणणं आहे की, बिहारमध्ये दारू बंदी आहे, तरी देखील ही परिस्थिती. तर काही जणांनी नवरदेवाल सल्ला देखील दिला की, भावा.. लग्नाच्या दिवशी तरी कंट्रोल करायचं ना..! 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी