Viral Video : रेल्वे क्रॉसिंगवर थोडक्यात बचावला, बाईकचा झाला चेंदामेंदा 

इटावा येथे बंद रेल्वे क्रॉसिंगवरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या अति उत्साह महागात पडला. रेल्वे क्रॉसिंगवर गेट बंद असताना त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुचाकी स्वाराच्या दुचाकीला झारखंड स्वर्णजयंती एक्स्प्रेसने उडवल्याची घटना घडल्याच्या तीन दिवसांनंतर, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral video Etawah Commuter's bike stuck on track at railway crossing blown to pieces by passing train
रेल्वे क्रॉसिंगवर थोडक्यात बचावला, बाईकचा झाला चेंदामेंदा  
थोडं पण कामाचं
  • इटावा येथे बंद रेल्वे क्रॉसिंगवरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या अति उत्साह महागात पडला.
  • रेल्वे क्रॉसिंगवर गेट बंद असताना त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुचाकी स्वाराच्या दुचाकीला झारखंड स्वर्णजयंती एक्स्प्रेसने उडवल्याची घटना घडल्याच्या तीन दिवसांनंतर, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  • घटना २६ ऑगस्टची आहे जेव्हा इटावा रेल्वे स्थानकाजवळील रामनगर रेल्वे क्रॉसिंग बंद होते

इटावा :  इटावा येथे बंद रेल्वे क्रॉसिंगवरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या अति उत्साह महागात पडला. रेल्वे क्रॉसिंगवर गेट बंद असताना त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुचाकी स्वाराच्या दुचाकीला झारखंड स्वर्णजयंती एक्स्प्रेसने उडवल्याची घटना घडल्याच्या तीन दिवसांनंतर, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral video Etawah Commuter's bike stuck on track at railway crossing blown to pieces by passing train)

 
रेल्वे क्रॉसिंगवर थोडक्यात बचावला, बाईकचा झाला चेंदामेंदा रेल्वे क्रॉसिंगवर थोडक्यात बचावला, बाईकचा झाला चेंदामेंदा Posted by Times Now Marathi on Monday, August 29, 2022

घटना २६ ऑगस्टची आहे जेव्हा इटावा रेल्वे स्थानकाजवळील रामनगर रेल्वे क्रॉसिंग बंद होते, असे असतानाही अनेक लोक बंद रेल्वे फाटकातून जात असताना हातियाहून आनंद बिहारकडे जाणारी १२८७३ झारखंड स्वर्णजयंती एक्स्प्रेस भरधाव वेगात येत असल्याचे पाहून दुचाकीस्वाराने दुचाकी सोडून पळ काढला. भरधाव येणाऱ्या रेल्वेने खेळण्याच्या गाडीप्रमाणे दुचाकीला ट्रॅकवरून दूर फेकले. अपघात इतका भीषण होता की त्यानंतर दुचाकीचे अनेक भाग रेल्वेच्या इंजिनमध्ये अडकले, त्यानंतर ट्रेन थांबवावी लागली.या घटनेनंतर जीआरपीने दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी