जालन्यातील व्हायरल व्हिडिओतील पीडित युगुलाने केला विवाह... पण 

संस्कृती रक्षणाच्या नावाखाली प्रेमी युगुलाला मारहाण आणि तरूणीचा विनयभंगाच्या व्हायरल व्हिडिओमुळे जालन्यासह राज्यात खळबळ उडाली होती. आता या घटनेला वेगळे वळण लागले आहे. या घटनेतील पीडित युगुलाने लग्न केल्याचे समो

viral video girl and boy get married in jalana virral news in marathi
जालन्यातील व्हायरल व्हिडिओतील पीडित युगुलाने केला विवाह... पण  

जालना :  संस्कृती रक्षणाच्या नावाखाली प्रेमी युगुलाला मारहाण आणि तरूणीचा विनयभंगाच्या व्हायरल व्हिडिओमुळे जालन्यासह राज्यात खळबळ उडाली होती. आता या घटनेला वेगळे वळण लागले आहे. या घटनेतील पीडित युगुलाने लग्न केल्याचे समोर आले आहे. 

जालना जिल्ह्यातील मेंडगाव शिवारात घडलेल्या घटनेत एका टोळक्याकडून प्रेमी युगुलाला मारहाण झाली होती. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर ती प्रचंड व्हायरल झाला होता घटनेची दखल घेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले होते. पोलिसांनी आपले सूत्र हलवत व्हिडिओच्या आधारे आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या.

या घटनेला काही दिवसच गेले असता मारहाण झालेल्या त्या प्रेमी युगुलांनी कायमस्वरूपी सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि आज मेंढगावातील एका मंदिरात लग्नगाठ बांधली आहे. 

प्रेमी युगुल अल्पवयीन

व्हिडिओतील प्रेमी युगुलांनी लग्न केल्याची चर्चा आता सर्वत्र पसरत आहे. परंतु हे प्रेमीयुगुल अल्पवयीन असल्याची देखील धक्कादायक बाब समोर आली आहे. आमच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षकांना संपर्क साधला असता हे प्रेमीयुगुल अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु कारवाईच मला माहीत नसून ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे. त्यामुळे या घटनेला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे

असा घडला होता प्रकार

महाराष्ट्राला काळीमा फासणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका प्रेमी युगुलाला मारहाण होत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. एक टोळकं प्रेमी युगुलाला मारहाण करत तुझ्या बापाचा नंबर दे म्हणून त्यांना हा मारहाण करताना दिसत आहे. इतकचं नव्हे तर तरुण तरुणीला कॉलर पकडून फरफटत नेत आहेत. हा व्हिडीओ टोळीतीलच एकाने अल्पवयीन मुलाने बनवलेला दिसत आहे. पीडित तरुण विनंती करत आहे परंतु टोळक्यातील तरुण मात्र ऐकत नाहीत. 

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत आरोपींवर लवकरात लवकर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन देखील दिलं आहे

पोलिसांनी ही तातडीने घटनेचा गांभीर्य लक्षात घेत चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आमच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षकांची संपर्क साधला असता अधीक्षकांनी सांगितले की आतापर्यंत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहे. ३५४,३२४,२९४,५०४,५०६ या कलमानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहेत हे आरोपी

  1. मुख्य आरोपी -  अतिश खंदारे वय २७ वर्षांचा असून तो विवाहित आहे. त्याने १० वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. आरोपी घटनेनंतर फरार होता. 
  2. दुसरा आरोपी - २८ वर्षीय सुशील वाघ असून तोही विवाहित आहे. शेतीचा व्यवसाय करतो. घरची जनावरे घेवून तो घटनास्थळी आला होता. 
  3. तिसरा आरोपी - कारभारी वाघ, हा आठवीपर्यंत शिकला असून विवाहित आहे. 
  4. व्हिडिओ बनविणारा आरोपी - हा अल्पवयीन असून तो ९ वी इयत्तेत शिकतो आहे. त्याच्या वडिलांचा शेतीचा व्यवसाय आहे. 
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी