Viral Video: ब्लँकेट मिळताच दिव्यांग उठला अन् चालायला लागला; जाणून घ्या काय आहे सत्य

व्हायरल झालं जी
Updated Jan 08, 2022 | 18:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral Video | सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती दिव्यांगाच्या खुर्चीवर बसला आहे आणि ब्लँकेट मिळताच तो तिथून उठून निघून जातो. लक्षणीय बाब म्हणजे हा जुना व्हिडीओ पुन्हा एकदा संभ्रम निर्माण करत आहे.

Viral Video handicap got up as soon as he got the blanket and started walking Find out what is the truth
ब्लँकेट मिळताच दिव्यांग उठला अन् चालायला लागला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावरील काही युजर्संनी हा व्हिडिओ आम आदमी पार्टीच्या ब्लँकेट वाटपाच्या कार्यक्रमातील असल्याचे सांगितले आहे
  • हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील आहे जिथे एका स्थानिक एनजीओने पूर्णपणे अपंग असलेल्या लोकांना ब्लँकेटचे वाटप केले.
  • व्हिडीओमध्ये व्हीलचेअरवर बसलेले रमेश सिंग या अपंग व्यक्तीने सांगितले की, मी शरीराने ४० टक्के अपंग आहे आणि माझ्याकडे असलेले भारत सरकारचे प्रमाणपत्र यास सिध्द करते.

Viral Video | नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर (Social Media) असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती दिव्यांगाच्या खुर्चीवर (Handicap Chair) बसला आहे आणि ब्लँकेट (Blanket) मिळताच तो तिथून उठून निघून जातो. लक्षणीय बाब म्हणजे हा दोन वर्षापूर्वीचा जुना व्हिडीओ पुन्हा एकदा संभ्रम निर्माण करत आहे. दरम्यान सोशल मीडियावरील काही युजर्संनी (Users) हा व्हिडिओ आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) ब्लँकेट वाटपाच्या कार्यक्रमातील असल्याचे सांगितले आहे. तर काही युजर्स यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता याला जादुचा ब्लँकेट्स असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नेमकं या व्हिडीओ मागील काय सत्य आहे याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. (Viral Video handicap got up as soon as he got the blanket and started walking Find out what is the truth). 

वस्तुस्थिती तपासल्यानंतर सत्य आले समोर 

दरम्यान, जेव्हा या प्रकरणाची सत्यता तपासली तेव्हा सत्य काहीसे वेगळेच असल्याचे समोर आले. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील आहे जिथे एका स्थानिक एनजीओने पूर्णपणे अपंग असलेल्या लोकांना ब्लँकेटचे वाटप केले. लक्षणीय बाब म्हणजे हे प्रकरण दोन वर्षांपूर्वी जानेवारी २०२० चे आहे. मात्र व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या बॅनरवर 'डिजिटल साक्षरता संस्था, ब्लँकेट वितरण समारंभ' असे लिहिले आहे, हे उत्तर प्रदेशमधील आधारित एनजीओचे एक फेसबुक पेज आहे. 

https://twitter.com/ipskabra/status/1479119544803233795?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1479119544803233795%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fhindi%2Foff-beat%2Ffact-check-after-getting-blanket-disabled-person-got-up-start-walking-know-the-truth%2F1065195

हे अभियान उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एनजीओद्वारे चालवले जाते 

बिजनौर जिल्ह्यातील सोहरा येथील अशासकिय साक्षरता संस्था उद्योगपती रवी सैनी चालवतात. त्यांनी सांगितले की एनजीओच्या नेतृत्वाखाली ब्लँकेट वाटप मोहीम राबविण्यात आली आणि व्हीलचेअरवर बसलेली व्यक्ती रमेश सिंग आहे. रवी सैनी स्वत:ला एक व्यावसायिक संबोधतात जे माहिती प्रसारण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी जवळून काम करतात.

नेमकी व्हीलचेअरवर बसलेली व्यक्ती कोण आहे?

व्हिडीओमध्ये व्हीलचेअरवर बसलेले रमेश सिंग या अपंग व्यक्तीने सांगितले की, मी शरीराने ४० टक्के अपंग आहे आणि माझ्याकडे असलेले भारत सरकारचे प्रमाणपत्र यास सिध्द करते. दरम्यान त्या व्यक्तीला हे विचारले की चालण्यासाठी व्हीलचेअर वापरतो का असे विचारले असता, त्यांनी नकार देत म्हटले की एनजीओ सदस्यांच्या विनंतीनुसार ते ब्लँकेट वाटप मोहिमेच्या दिवशी व्हीलचेअरवर बसले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी