Snake on tree : जगात सापांच्या अनेक जाती आहेत. ज्यांच्याविषयी आपल्याला माहिती नाही. परंतु यात जातीमधील एक प्रकार सर्वांना माहिती आहे. तो प्रकार आहे अजगर. ही सापाची अशी एक प्रजाती आहे, जी आपल्या शिकारला जिवंत गिळण्यासाठी ओळखली जाते. तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यात अजगर हा ससा, शेळी, हरीण आणि मगरीलाही गिळत आहे. जाणकार सांगतात की, अजगरापासून नेहमी अंतर ठेवलं पाहिजे, आणि त्यांना पाहताच मार्ग बदलला पाहिजे.
अजगराचा असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जे पाहून लोकांच्या मनात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओमध्ये एक महाकाय अजगर अतिशय धक्कादायक पद्धतीने झाडावर चढताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नट-बोल्टप्रमाणे अंगाचा आकडा करून अजगर झाडावर चढत आहे. दरम्यान कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये अजगराचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अजगराच्या अॅक्रोबॅटिक्सचा हा व्हिडिओ पाहून सर्पतज्ज्ञही थक्क झाले आहेत. तुम्ही पाहू शकता की अजगर नट-बोल्टप्रमाणे स्वतःला घट्ट करण्यासाठी त्याच्या शरीराचा वापर करतो आणि नंतर वर सरकतो.
अधिक वाचा :कलरफुल प्राजक्ता माळीची दिलखूश अदा
त्याच प्रकारे तो झाडावर मोठ्या उंचीवर चढतो. हा धक्कादायक व्हिडिओ @WowTerrifying नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे की तो आतापर्यंत 9 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला हजारो लोकांनी लाइक केले आहे.