Viral Video : रस्त्यावर भलामोठा साप बघून एका नागरिकाने केले 'हे' काम

Viral Video man picked up snake with his hand and threw it watch shocking video : व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत जंगलातून जात असलेल्या एका रस्त्यावर भलामोठा साप दिसत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून सरपटत साप जंगलाच्या एका भागातून रस्त्यावर आला आहे.

Viral Video man picked up snake with his hand and threw it watch shocking video
Viral Video : रस्त्यावर भलामोठा साप बघून एका नागरिकाने केले 'हे' काम  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Viral Video : रस्त्यावर भलामोठा साप बघून एका नागरिकाने केले 'हे' काम
  • नागरिकाने सापाला जंगलाच्या दिशेने ढकलले आणि अपघात टळला
  • साप जंगलाच्या दिशेने गेला आणि वाहन रस्त्यावरून पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला

Viral Video man picked up snake with his hand and threw it watch shocking video : हल्ली जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल असतो. स्मार्टफोन धारकांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे आणि ही संख्या दररोज वाढत आहे. मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियावर मुशाफिरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमध्ये एका सापाचा व्हिडीओ (snake viral video) आहे. । व्हायरल झालं जी

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत जंगलातून जात असलेल्या एका रस्त्यावर भलामोठा साप दिसत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून सरपटत साप जंगलाच्या एका भागातून रस्त्यावर आला आहे. रस्त्यावरून जात असलेल्या वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशात साप सुस्पष्ट दिसतो. सापाचा आकार पाहून भल्या भल्यांना भीती वाटेल. पण एका नागरिकाला सापाची बिलकूल भीती वाटत नाही. तो पटकन रस्त्यावरून चालत वेगाने पुढे सरसावतो. सापाला एका बाजुने उचलून जंगलाच्या दिशेने पुढे ढकलतो. नंतर साप सरपटत जंगलाच्या दिशेने पुढे जाऊ लागतो आणि रस्त्यावरून जात असलेल्या वाहनाचा मार्ग मोकळा होतो. एक अपघात टळतो.

वाहन भरधाव वेगाने पुढे गेले असते तर रस्त्यावर असलेला साप चिरडला गेला असता. पण एका नागरिकाने सापाला जंगलाच्या दिशेने ढकलले आणि अपघात टळला. साप जंगलाच्या दिशेने गेला आणि वाहन रस्त्यावरून पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

Lalu Prasad Yadav Mimicry: लालू प्रसाद यादवांची ‘ही’ मिमिक्री पाहिली का? तेजप्रतापही झाले थक्क

एरवी साप दिसला तर सर्पदंश होईल, विषारी साप असल्यास जीवावर बेतेल या भीतीने अनेकजण घाबरतात. सापापासून दूर पळतात. पण एका नागरिकाने रस्त्यावर भलामोठा साप असूनही पुढे जाऊन सापाला उचलले. जंगलात सर्पदंश झाला असता तर वैद्यकीय मदत मिळवण्यात वेळ गेला असता. तोपर्यंत कदाचित जीवावर बेतले असते. पण साप उचलणाऱ्या नागरिकाने ही चिंता केली नाही. रस्त्यावर असलेला साप वाहनाखाली आल्यास चिरडला जाईल असा विचार संबंधित नागरिकाने केला. याच विचारातून संबंधित नागरिकाने साप उचलला आणि बाजुला केला. सापाला जंगलाच्या दिशेने वेगाने जाण्यासाठी थोडे पुढे ढकलले. 

बापरे..., एकाच्या पोटातून बाहेर आले 63 चमचे, डॉक्टरही आश्चर्यचकित

भल्यामोठ्या सापाला उचलून रस्त्यावरून जंगलाच्या दिशेने पुढे ढकलणाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून अनेकांना भीत वाटत आहे. तर काहींनी साप उचलणाऱ्याचे कौतुक केले आहे. साप उचलणाऱ्याच्या धाडसामुळे साप वाहनाखाली चिरडला जाण्याचा धोका टळला असे मत काहींनी व्यक्त केले. सोशल मीडियावर साप उचलून बाजुला करणाऱ्याचा व्हिडीओ हजारो नागरिकांनी बघितला. व्हिडीओ बघणाऱ्यांपैकी अनेकांनी लाइक केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी