Snake Attacks Viral Video: विषारी सापासोबत खेळत होता, जीव आला धोक्यात

व्हायरल झालं जी
Updated Mar 20, 2023 | 15:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Snake Attacks Viral Video: साप समोर दिसला की लगेच आपला रस्ता बदलावा असे वडीलधाऱ्या माणसांनी सांगून ठेवले आहे !  मात्र त्यानंतरही काही महारथी सापाच्या मार्गाला जात आपल्या जीवाचा खेळ करतात. सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ वायरल झाला आहे. 

हा व्हीडियो पाहून तुमचा ही उडेल थरकाप
जय ब्रेवर नावाच्या प्राणितज्ञाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला व्हीडियो.   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • जय ब्रेवर नावाच्या प्राणितज्ञाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला व्हिडिओ .
  • हा व्हिडिओ पाहून तुमचा ही उडेल थरकाप
  • साप हा पृथ्वीवरच्या सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक असल्याचे मानले जाते.

Snake Attacks Viral Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओमध्ये अनेकजण वेगवेगळ्या करामती करताना दिसतात. तर काहींना व्हिडिओ बनवणं खूपच महागात पडत असतं. आज आपण अशाच काही व्हिडिओमध्ये पाहू शकतात की, एक व्यक्ती विषारी सापासोबत खेळत आहे.  याचदरम्यान सापाने त्याच्यावर हल्ला चढवला. पुढे काय झाले ते या व्हायरल व्हिडिओमधून नक्की पहा.

हे पण वाचा : मुंबई विद्यापीठ उन्हाळी सत्राच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

साप हा पृथ्वीवरच्या सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक असल्याचे मानले जाते. कधी कधी हे साप इतके उग्र होतात की ते मनुष्याला मृत्यूच्या दारात पोहोचवतात. काही विषारी सापांच्या प्रजाती इतक्या भयंकर असतात की,  एकाचवेळी शंभराहून जास्त लोकांचा बळी ते घेऊ शकतात. त्यामुळे, साप समोर दिसला की लगेच आपला रस्ता बदलावा असे वडीलधाऱ्या माणसांनी सांगून ठेवले आहे. मात्र त्यानंतरही काही महारथी सापाच्या मार्गाला जात आपल्या जीवाचा खेळ करतात. सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ वायरल झाला आहे. 

हे पण वाचा : बीड - परळीत 16 वर्षीय दहावीच्या मुलीचा लावला बालविवाह

हा व्हिडिओपाहून तुमचा देखील उडेल थरकाप

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल की एक व्यक्ती एका भयानक सापासोबत खेळ दाखवत आहे. हा साप त्याने आपल्या दोन हातात झेलला असून तो त्याच्यासोबत खेळत आहे. याच दरम्यान सापाने त्याच्यावर हल्ला चढवला. मात्र, त्या व्यक्तीचे नशीब चांगले म्हणून या हल्ल्यातून त्याने स्वतःचा बचाव केला. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी त्याला सापापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

पहा हा व्हिडिओ-

  

हा व्हिडिओ जय ब्रेवर नावाच्या एका व्यक्तीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. हा एक कुशल प्राणितज्ञ आहे. यात त्याने एक लांबलचक साप धरलेला आहे. तो कॅमेऱ्यासमोर काहीतरी सांगताना दिसतो. त्यादरम्यान, साप त्याच्यावर हल्ला करतो. मात्र, तो माणूस या हल्ल्यातून स्वत:ला वाचवण्यात यशस्वी होतो. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हा ९ फूट लंबीचा साप जगातील सर्वात मोठ्या रॅट स्नेकपैकी एक आहे. ह्यांना keeled rat snakes असे  म्हणतात.  त्यांना आपले विष सोडण्यासाठी चावणे गरजेचे असते.  हा एक सुंदर दक्षिण पूर्व आशियाई साप आहे.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी