The mongoose and king cobra : सोशल मीडियावर अनेक प्राण्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात जर सापाचे व्हिडिओ असतील तर ते व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. त्यात साप आणि मुंगूस यांच्या लढाईचा व्हिडिओ असला तर खूप व्हायरल होत असतो. साप आणि मुंगूसच्या लढाईत बहुतेक वेळा मुंगूस जिंकत असतो आणि साप जिवाशी जात असतो. परंतु इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मात्र हे चित्र उलट झालं आहे. (Unique fight of mongoose king cobra, video went viral)
अधिक वाचा : फक्त हेच लोक बनू शकतात स्पर्म डोनर
या दोघांच्या लढाईचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याला बघून सगळेजण थक्क झाले आहेत. कारण या व्हिडिओमध्ये कोब्राने मुंगूसची ठार केलं आहे. व्हायरल क्लिपमध्ये नागाने मुंगूसाच्या गळ्याला आवळलं त्यात मुंगूसचा जीव गेला आहे.
दरम्यान नागच्या वेढ्यात मुंगूस मेलाय. परंतु आपला शत्रू खरचं मेलाय का हे तपासण्यासाठी नाग पण त्यावर चाल करतो. परंतु मुंगूसला पाहिल्यानंतर नाग तेथून पळून जातो. यावर पण लोकांचा यावर विश्वास बसत नाहीये. काहीजण म्हणत आहेत की, मुंगूस मेला नाहीये, तो फक्त बेशुध्द पडला आहे. पण हा व्हिडीओ काहीच सेकेंड्सचा असल्यामुळे पुढे काय झालं याची माहिती समजू शकली नाही.
अधिक वाचा : किती श्रीमंत आहे शाहरूखची Wife गौरी खान
या क्लिपमध्ये बघू शकता की, कोब्राने फना काढत मुंगूसला वेढा घातला आहे. त्यामुळे मुंगूस तिथेच पडून राहिले आहे. त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारची हालचाल होताना दिसत नाहीये. मुंगूसची हालचाल जाणवत नसल्यानं नाग आपल्या तावडीतून मुंगूसला सोडतो आणि तेथून निघून जातो. या चकीत करणाऱ्या व्हिडीओला 28 जानेवारीला इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले होते आणि असे लिहिले होते की, विश्वास बसत नाहीये सापाने मुंगूसला मारले आहे.
अधिक वाचा :स्टार किड्सच्या हिंदीची बोंब
या लढाईचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ही बातमी लिहेपर्यंत या क्लिपला 3 लाख 44 हजार व्ह्यूज आणि 12 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सोबतच अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, हे दुर्लभ आहे. तर काहींनी लिहिल आहे की, मुंगूस मेलं नाहीये, ते फक्त बेशुध्द पडले आहे. तर काहींनी त्याला खतरनाक म्हटले आहे. अशा अनेक कमेंट केल्या आहेत.