Viral Video : संकटात सापडलेल्या आईला चिमुरड्याने वाचवले

viral video mother was caught in trouble son helped him with his little hands : व्हायरल व्हिडीओ आई आणि मुलाशी संबंधित आहे. जेव्हा आईवर संकट येते तेव्हा मूल तिच्यासाठी काहीही करण्यास तयार असते. याचे ताजे उदाहरण म्हणजे हा व्हायरल व्हिडीओ

Viral Video
Viral Video : संकटात सापडलेल्या आईला चिमुरड्याने वाचवले 
थोडं पण कामाचं
  • संकटात सापडलेल्या आईला चिमुरड्याने वाचवले
  • व्हिडीओ व्हायरल
  • व्हिडीओ बघून अनेकांनी केले कौतुक

viral video mother was caught in trouble son helped him with his little hands : आई आणि मुलाचे नाते खूप खास असते. जेव्हा मुलावर संकट येते तेव्हा आई जीव धोक्यात घालून मुलाला वाचवते. दुसरीकडे, जेव्हा आईवर संकट येते तेव्हा मूल तिच्यासाठी काहीही करण्यास तयार असते. याचे ताजे उदाहरण म्हणजे सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ आहे. 

व्हायरल व्हिडीओ आई आणि मुलाशी संबंधित आहे. एक महिला शिडीच्या मदतीने उंचावर उभी राहून दरवाज्याच्या चौकटीशी संबंधित काम करताना दिसते. महिलेचे काम सुरू असताना शिडी पडते आणि महिला छताला लटकून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करू लागते.

महिला उंचावर लटकत असताना तिच्या मदतीसाठी जवळपास कोणी मोठी व्यक्ती तिथे नसते. पण जवळच महिलेचा लहान मुलगा असतो. तो आई अडचणीत सापडल्याचे बघतो आणि धावत जाऊन पडलेली शिडी उचलतो. शिडीचे वजन पेलणे चिमुरड्यासाठी कठीण असते. पण या परिस्थितीतही मुलगा शिडी उचलण्याचा प्रयत्न करतो. आई छताला लटकलेल्या अवस्थेत पायांच्या मदतीने शिडी व्यवस्थित उभी करण्यास मुलाला मदत करते. शिडी व्यवस्थित उभी राहते आणि महिलेचे संकट टळते. 

चिमुरड्याने आईला केलेल्या मदतीचा व्हिडीओ दिपांशू काब्रा यांनी ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओ बघून अनेकांनी चिमुरड्याचे कौतुक केले. हा व्हिडीओ अनेकांनी लाईक, शेअर आणि रिट्वीट केला आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ बघितला आहे.

Viral Video : चिमुरड्याने जबड्यात घातला हात आणि सिंहिणीचे मोजले सारे दात

Viral Video Fire Stunt : स्टंटच्या नादात नको त्या ठिकाणी लागली आग, बघा थरारक व्हायरल व्हिडीओ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी