Viral Video : खऱ्या कोब्रासोबत नागीण डान्स

Viral Video Nagin Dance With Real Cobra Shocking Video Goes Viral : सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ बघून अनेकांच्या अंगाचा थरकाप उडत आहे. हा व्हिडीओ लग्नाच्या वरातीचा.

Viral Video Nagin Dance With Real Cobra Shocking Video Goes Viral
Viral Video : खऱ्या कोब्रासोबत नागीण डान्स  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Viral Video : खऱ्या कोब्रासोबत नागीण डान्स
  • लग्नाच्या वरातीचा व्हिडीओ
  • आसाममधील व्हिडीओ

Viral Video Nagin Dance With Real Cobra Shocking Video Goes Viral : सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हायरल फोटो आणि व्हिडीओ गमतीशीर असतात तर काही व्हायरल फोटो आणि व्हिडीओ बघून भीती वाटते, अंगाचा थरकाप उडतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ बघून अनेकांच्या अंगाचा थरकाप उडत आहे. हा व्हिडीओ लग्नाच्या वरातीचा.

होय लग्नाच्या वरातीत वऱ्हाडी नाचत आहेत. पण नाचणाऱ्यांचा हा व्हिडीओ अंगाचा थरकाप उडवित आहे. कारण तसेच खास आहे. व्हिडीओत नाचताना दिसत असलेली मंडळी एका खऱ्या कोब्रासोबत नृत्य करत आहेत. 

खऱ्या कोब्रासोबतचा हा नागिण डान्स अनेकांच्या अंगाचा थरकाप उडवित आहे. हा व्हिडीओ ओडिशातील मयूरगंज परिसरातील असल्याचे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. 

व्हिडीओत एक व्यक्ती पुंगी वाजवत आहे. या व्यक्तीच्या एका हातात पुंगी आणि दुसऱ्या हातात एक टोपली आहे. टोपलीतून बाहेर आलेला कोब्रा कधी पुंगीकडे तर कधी समोरच्या गर्दीकडे बघत डुलत आहे. वऱ्हाडी मंडळी पुंगीवाल्या गारुड्याच्या मागून चालत आहेत आणि नागिण डान्स करत आहेत. वऱ्हाडींकडे बघून ते मजेत आहेत आणि आनंदाने नागिण डान्स करत आहे हे दिसते. पण हा व्हिडीओ बघताना अनेकांच्या अंगाचा थरकाप उडत आहे. 

अकल्पनीय असे दृश्य दिसत असल्यामुळे अनेकांच्या अंगाचा थरकाप उडत आहे. कारण व्हिडीओ बघणाऱ्यांपैकी अनेकांनी आतापर्यंत जीवंत कोब्रासोबत एकाचवेळी अनेकांनी नागिण डान्स केल्याचे कधीही बघितलेले नाही. 

कोब्रासोबतचा हा नागिण डान्स प्रत्यक्षात ज्यावेळी सुरू होता त्यावेळी काही नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती दिली. प्राण्यांना त्रास देणे, बेकायदा पद्धतीने सोबत प्राणी बाळगणे अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी पाच जणांविरोधात कारवाई केली. यामुळे नागिण डान्स प्रकरणाची चर्चा स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात झाली. आता जीवंत कोब्रासोबतच्या नागिण डान्सचा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत आहे आणि चर्चेचा विषय झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी