New York candidate for Congress releases adult film with pornstar to prove he is sex positive : निवडणूक रिंगणात उतरल्यावर जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवार प्रयत्नांची शर्थ करताना दिसतो. पण काही उमेदवार जिंकण्यासाठी अचाट प्रयोग करतात. या प्रयोगांची चर्चा पुढे अनेक दिवस सुरू राहते. असाच एक प्रकार अमेरिकेत घडला.
यूएस काँग्रेसच्या निवडणुकीत विजय मिळवून जेरी नाडलर यांची जागा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उमेदवाराने स्वच्छेने प्रसिद्ध केला आहे. व्हिडीओ प्रसिद्ध करणाऱ्या उमेदवाराचा हेतू तो सेक्स पॉझिटिव्ह असल्याचे मतदारांसमोर सिद्ध करणे हा आहे.
माइक इटकिस (Mike Itkis) अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. या उमेदवाराने स्वतःचा पॉर्नहब या वेबसाईटसाठी केलेला व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ 13 मिनिटांचा आहे. बकेट लिस्ट बोनान्झा (Bucket List Bonanza) या नावाने व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ 3 महिन्यांपूर्वी पॉर्नहब या वेबसाईटवर अपलोड झाला. पण माइक इटकिसने (Mike Itkis) निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर व्हिडीओ बघणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली.
स्वच्छेने सेक्स करण्याचे स्वातंत्र्य असेल तर गर्भपाताचे स्वातंत्र्य पण असायला हवे अशी भूमिका माइक इटकिस यांनी घेतली आहे. अमेरिकेत महिलेला स्वेच्छेने गर्भपात करण्याचे कायदेशीर स्वातंत्र्य उपलब्ध नाही. हाच मुद्दा घेऊन माइक इटकिस निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शरीरविक्रयाचा व्यवसाय करणाऱ्यांविरोधात गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करू नये, लग्न या विषयातील सरकारी यंत्रणेचा समावेश संपवावा असेही त्यांचे म्हणणे आहे. आपले मुद्दे जनतेसमोर मांडून त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी माइक इटकिस प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून त्यांनी न्यूयॉर्कच्या एका सेक्स वर्करसोबतचा त्यांचा 13 मिनिटांचा व्हिडीओ पॉर्नहबवर अपलोड केला आहे.
माइक इटकिस यांचे मुद्दे आणि प्रचाराचा भाग म्हणून त्यांनी केलेला व्हिडीओ हे सर्व फक्त चर्चेत राहण्याचे उद्योग आहेत, असे त्यांच्या विरोधकांचे म्हणणे आहे.
निवडणुकीत उमेदवार म्हणून एक 53 वर्षांचे निवृत्त लष्करी अधिकारी पण सहभागी झाले आहेत. प्रायव्हसीचे संरक्षण, सायबर सुरक्षा हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत.
Chanakya Niti: ‘या’ पाच गोष्टी कधीच कुणाला सांगू नका, आयुष्यभर कराल पश्चात्ताप
Key to successful relation: साखरपुडा आणि लग्न यात बरेच दिवस आहेत? अजिबात चुकवू नका सुवर्णसंधी
माइक इटकिस यांच्या विरोधात रिपब्लिक पक्षाचे माइक झुमब्लसकस (Mike Zumbluskas) निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काही उमेदवार प्रचारासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी विशिष्ट मुद्यांची निवड करतात. हे उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही, असे सांगत माइक झुमब्लसकस यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात लढाई सुरू आहे. या लढाईत अमेरिकेने युक्रेनला समर्थन आणि मदत तर रशियाला शक्य तेवढा तीव्र विरोध अशी भूमिका घेतली आहे. यामुळे युक्रेनमध्ये काय होते याकडे अनेकांचे लक्ष असतानाच अमेरिकेतील निवडणुकीत युक्रेनशी कनेक्शन असलेले माइक इटकिस उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. माइक इटकिस यांचा अमेरिकेत स्थायिक असले तरी त्यांचा जन्म युक्रेनमध्ये झाला आहे. अविवाहीत असलेल्या माइक इटकिस यांना अनेकजण खुल्या विचारांचा माणूस म्हणून ओळखतात.