Viral Video Of Cobra Snake Was Doing Yoga : निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी योगासने मोठी मदत करतात. याच कारणामुळे योगासने करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. योगगुरू बाबा रामदेव यांचे उपक्रम तसेच आंतरराष्ट्रीय योगदिन आणि इतर कारणांमुळे मागील काही वर्षांत योगासने करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सोशल मीडियावर योगासनांबाबत मार्गदर्शन करणारे व्हिडीओ लोकप्रिय होत आहेत. या लोकप्रिय व्हिडीओंसोबतच एक भन्नाट व्हिडीओ पण लोकप्रिय झाला आहे. हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक कोब्रा साप योगासनांमधील प्राणायाम हा प्रकार करताना दिसत आहे.
कोब्रा कुंडली मारुन बसला आहे. प्राणायाम करतात त्यावेळी शरीरात जास्तीत जास्त ऑक्सिजन घेतला जातो. नंतर श्वास सोडतात. ही प्रक्रिया सुरू असताना पोटाची मोठ्या प्रमाणावर हालचाल होते. अशाच स्वरुपाची हालचाल कोब्राच्या पोटाची होत असल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर ३७ सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात साप कुंडली मारुन प्राणायाम करताना दिसत आहे. श्वास घेतल्यावर सापाचे पोट फुगत असल्याचे आणि श्वास सोडल्यावर सापाचे पोट पुन्हा सामान्य स्थितीत जात असल्याचे दिसत आहे. कोब्रा योगा करत असल्याचे पाहून सोशल मीडियावर व्हिडीओ बघणाऱ्यांनी गमतीशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.