Viral video of cricketer Ishan Kishan dance : भारताने झिम्बाब्वे विरुद्धची तीन वन डे मॅचची सीरिज ३-० अशी जिंकली. या दणदणीत विजयानंतर भारताचा क्रिकेटपटू ईशान किशन याने ड्रेसिंग रूममध्ये डान्स करून आनंद व्यक्त केला. ईशानच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ईशान किशन आता बिहारची राजधानी पाटणा येथे वास्तव्यास आहे. पण त्याची आजी नवाडातील प्रसिद्ध सिव्हिल सर्जन आहे. नागरिकांनी आता ईशानला क्रिकेटपटू म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली आहे. पण नवाडातील नागरिकांना तो एका प्रसिद्ध सर्जनचा क्रिकेट खेळणारा लाडका नातू म्हणून आधीपासूनच माहिती आहे. यामुळे नवाडातील नागरिकांनी ईशानचे भन्नाट नृत्य पाहून आश्चर्य आणि कौतुक अशा मिश्र भावना व्यक्त केल्या.
भारताने झिम्बाब्वे विरुद्धची पहिली वन डे दहा विकेट राखून तर दुसरी वन डे पाच विकेट राखून जिंकली. नंतर तिसरी वन डे भारताने १३ धावांनी जिंकली. तिन्ही मॅच जिंकत भारताने झिम्बाब्वे विरुद्धची तीन वन डे मॅचची सीरिज ३-० अशी जिंकली. या दणदणीत विजयानंतर भारताचा क्रिकेटपटू ईशान किशन याने ड्रेसिंग रूममध्ये 'काला चश्मा' या गाण्यावर निवडक सहकाऱ्यांसोबत नृत्य करून विजयाचा आनंद साजरा केला.
कोणत्या शहरात कोणते रुचकर पदार्थ खावे
विना कपडे या ठिकाणी बिनधास्त साजरा करा हनीमून
ईशान किशन सोबत शिखर धवन, आवेश खान यांनीही नृत्य केले. पण ईशानच्या नृत्याचे जास्त कौतुक झाले. व्हायरल झालेल्या ३० सेकंदांच्या व्हिडीओत ईशान किशन नृत्य करताना दिसत आहे. ईशानच्या नृत्याविष्काराने अनेकांची मनं जिंकली. आतापर्यंत अनेक आयपीएल फ्रँचायजी तसेच ईशानच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या नृत्याविष्काराचा व्हिडीओ सोशल मीडियावर आपापल्या अकाउंटद्वारे प्रमोट केला आहे. यामुळे अलापवधीतच ईशानच्या नृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.