Viral Video Of Superdad, बाळाला सांभाळत केली अशी कृती जी २५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी बघितली

Viral Video Of Dad Catches Baseball While Feeding Baby : बाळाला बाटलीने दूध पाजत असलेल्या त्याच्या वडिलांनी असे काही केले की अनेकांनी त्यांचे कौतुक केले. या घटनेचा व्हिडीओ आतापर्यंत २५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी बघितला आहे. 

Viral Video Of Dad Catches Baseball While Feeding Baby
बाळाला सांभाळत केली अशी कृती जी २५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी बघितली 
थोडं पण कामाचं
  • बाळाला सांभाळत केली अशी कृती जी २५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी बघितली
  • व्हिडीओ व्हायरल
  • अनेकांनी केले बाळाच्या डॅडचे कौतुक

Viral Video Of Dad Catches Baseball While Feeding Baby : सर्वांच्या आयुष्यात सुरुवातीला फक्त आईवडील हेच त्यांचे सुपरहिरो असतात. वडिलांनी तर मुलं लहान असताना केलेली एखादी कृती ही त्या मुलांसाठी एक ठळक आठवण झाली असते जी आयुष्यभर त्यांची सोबत करते. काहीसे तसेच घडले. बाळाला बाटलीने दूध पाजत असलेल्या त्याच्या वडिलांनी असे काही केले की अनेकांनी त्यांचे कौतुक केले. या घटनेचा व्हिडीओ आतापर्यंत २५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी बघितला आहे. 

मेजर लीग बेसबॉल गेममध्ये सिनसिनाटी रेड्स आणि सॅन दिएओ पॅड्रेस यांच्यात मॅच सुरू होती. ही मॅच बघण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक आले होते. यात एक दाम्पत्य आपल्या बाळासोबत आले होते. मॅच बघत असताना वडील बाळाला बाटलीने दूध पाजत होते आणि त्यांच्या शेजारी बाळाची आई होती. बाळाचे आईबाबा इतर प्रेक्षकांसोबत मॅच एन्जॉय करत होते. अचानक बॅटरने (फलंदाज) फटकावलेला बॉल उडत प्रेक्षकांच्या दिशेने आला. हा बॉल हवेत असतानाच बाळाच्या वडिलांनी एका हातात झेलला. या अप्रतिम कॅचचे फूटेज स्टेडियममधील कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झाले. ब्रॉडकास्टसाठी मॅचचे लाइव्ह एडिटिंग करणाऱ्यांनी या घटनेचा एक स्वतंत्र व्हिडीओ करून तो टीव्हीवर दाखवला तसेच सोशल मीडिया टीमच्या मदतीने शेअर केला. थोड्याच वेळात हा व्हिडीओ टीव्ही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून २५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी बघितला. 

बाळाला बाटलीने दूध पाजताना वडिलांनी सहजतेने एका हातात कॅच पकडला. बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. त्याचे बाटलीने दूध पिणे व्यवस्थित सुर होते. हे पाहून अनेकांनी बाळाच्या वडिलांचे कौतुक केले. काही जणांनी या वडिलांचे अर्थात डॅडचे सुपरडॅड या शब्दात कौतुक केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी