Viral Video: ढोलताशा, डिजे, बँण्जो वाजण्यास सुरुवात होताच किंवा एखादे गाणे वाजण्यास सुरुवात होताच आपले पाय आपोआपच थिरकण्यास सुरुवात होते. सोशल मीडियात लहान मुले, तरुण-तरुणींच्या डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातच आता एका आजोबांचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असल्याचं पहायला मिळत आहे. (viral video of old uncle start dance infront of dancing girl watch video)
म्हातारपणी माणसाचे शरीर हळूहळू साथ देणं सोडतं. तारुण्यात जसा उत्साह असतो तसा उत्साह म्हातारपणात दिसत नाही. मात्र, सोशल मीडियात एका वयोवृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ पाहून सर्वच अवाक् झाले. तसेच हा व्हिडिओ पाहून आनंद लुटत आहेत.
व्हिडिओत दिसत आहे की, एक तरुणी स्टेजवर परफॉर्म करत आहे. बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या सिनेमातील सुपरहिट गाणे 'सलाम-ए-इश्क' गाण्यावर ही तरुणी डान्स करत आहे. तरुणीचा डान्स पाहून समोर बसलेले आजोबाही सक्रीय होतात आणि थेट स्टेजसमोर जावून उभे राहतात. त्यानतंर हे आजोबा स्टेजसमोर पोहोचून त्या तरुणीसोबत गाण्यावर ठुमके लगावताना दिसून येत आहेत.
हे पण वाचा : अंकशास्त्र : 2023 वर्ष तुमच्यासाठी कसे असणार?
एका सुंदर तरुणीला स्टेजवर नाचताना पाहून वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा पूर्ण उर्जेने भरून उभे राहतात आणि ते सुद्धा गाण्याच्या ठेक्यावर ठुमके लगावताना पहायला मिळत आहे. या आजोबांचा डान्स करतानाचा व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. समोर स्टेजवर असलेल्या सुंदर तरुणीचे ठुमके आणि तिच्यासमोर डान्स करत असलेले आजोबा हे दृष्य सर्वच उपस्थित पाहत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूव्ज मिळाले आहेत. तसेच मोठ्या संख्येने लाईक्स सुद्धा मिळत आहेत.