viral video of tall girl netizens surprised to see her family members height : सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अफाट उंचीच्या माणसांची फॅमिली (कुटुंब) दिसत आहे. : सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अफाट उंचीच्या माणसांची फॅमिली (कुटुंब) दिसत आहे. या व्हिडीओत तेमारा नावाची एक मॉडेल दिसत आहे. तेमाराची उंची 7 फूट आहे. तेमाराच्या आईची उंची 7 फूट 6 इंच आणि तिच्या वडिलांची उंची 6 फूट 3 इंच आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या कुटुंबातील सर्व अफाट उंचीच्या माणसांमध्ये तेमाराचे वडील हेच सर्वात कमी उंचीचे अर्थात बुटकी व्यक्ती आहे.
माणसाची उंची ही शरीरात विशिष्ट हार्मोन्सचे प्रमाण कमी आहे की जास्त यावर अवलंबून आहे. काही प्रमाणात स्ट्रेचिंगचे व्यायाम करून उंची वाढवता येते. पण प्रामुख्याने मानवी उंची ही विशिष्ट हार्मोन्सवर अवलंबून आहे. तेमाराच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या शरीरात उंचीशी संबंधित हार्मोन्स मोठ्या प्रमाणात सक्रीय आहेत. याच कारणामुळे तेमाराच्या कुटुंबातील सर्व सदस्य ताडमाड उंचीचे आहेत. या अफाट उंचीच्या नागरिकांना बघून अनेकजण चक्रावून जातात. पण ही उंचीची वाढ शास्त्रीय कारणामुळे झाली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
तेमाराने घरातल्यांसोबतचा व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे. या व्हिडीओत घरातले अफाट उंचीचे सदस्य दिसत आहेत. एवढ्या जास्त उंचीची माणसं एकत्र दिसण्याची वेळ तशी दुर्मिळ आहे. याच कारणामुळे तेमाराने शेअर केलेला व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ बघितला आहे.
अफाट उंचीची माणसं जगतात कशी, घरात आणि घराबाहेर वावरतात कशी याबाबत अनेकांमध्ये उत्सुकता आहे. हीच उत्सुकता शमविण्यासाठी अनेकजण तेमाराने शेअर केलेला व्हिडीओ बघत आहेत.
छान किती दिसती साराच्या या अदा