अब्दुल रझ्झाकचे महिला क्रिकेटरवर सेक्सिस्ट कॉमेंट, बौद्धिक दिवाळखोरी दाखवणाऱ्या अब्दुलला युजर्सनी धू धू धुतले

Viral Video : अब्दुल रझ्झाक आणि निदा डार या दोघांचाही व्हिडिओ (Video of Abdul Razzaq & Nida Dar) जून महिन्यातील आहे. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर (Social Media) मोठी चर्चा सुरू आहे.

Abdul Razzaq & Nida Dar
अब्दुल रझ्झाक आणि निदा डार यांची जुगलबंदी 

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानी टॉक शो मध्ये आले होते अब्दुल रझ्झाक आणि निदा डार
  • अब्दुल रझ्झाकची निदा डारवर घाणरेडी कॉमेंट
  • सोशल मीडियावर युजर्सकडून अब्दुल रझ्झाकची धुलाई

कराची: पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटर अब्दुल रझ्झाक याने महिला क्रिकेटर, 'निदा डार' वर केलेल्या लिंगभेदात्मक कॉमेंट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. अब्दुल रझ्झाक (Abdul Razzaq)आणि निदा डार (Nida Dar) हे दोघे पाकिस्तानी क्रिकेटर (Pakistan cricket) एका टॉक शो मध्ये आले होते. तिथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अब्दुल रझ्झाक आणि निदा डार या दोघांचाही व्हिडिओ (Video of Abdul Razzaq & Nida Dar) जून महिन्यातील आहे. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर (Social Media) मोठी चर्चा सुरू आहे. त्यावर वेगवेगळी मतमतांतरे व्यक्त करण्यात येत आहेत. शो मध्ये आलेल्या इतर तीन पाहुण्यांनी खेळातील महिलांच्या योगदानावर मते व्यक्त केली तर अब्दुल रझ्झाकने मात्र टिंगल उडवताना निदा डारच्या वेशभुषेवर सेक्सिस्ट (Sexist Comments by Abdul Razzaq) म्हणजे लिंगभेदात्मक कॉमेंट केली. (Pakistani All rounder Abdul Razzaq makes sexist comments on pakistani woman cricketer Nida Dar, Social Media Users trolls Razzaq)

पाकिस्तानी टॉक शो मध्ये घडलेला प्रकार

पाकिस्तानातील एक टॉक शोमध्ये आलेल्या निदा डारला जेव्हा विचारण्यात आले की 'जर ती क्रिकेटर नसती तर काय बनली असती. यावर निदा डार या पाकिस्तानी महिला क्रिकेटरने उत्तर दिले की क्रिकेटर नसते तर एक व्यावसायिक अॅथलिट झाली असती'. यावर एका व्यक्तीने तिला चेष्टेत विचारले की 'तुम्हाला लग्नाचे वावडे आहे का? यावर तुम्ही काही बोलत का नाही?' आणखी एक प्रश्न विचारला गेला की 'देशात महिलांसाठी किती स्पोर्ट्स अकदमी आहेत.' यावर एका अॅंकरने म्हटले की 'मला माहित आहे की कॉलेज स्तरावर फारच कमी आहेत'. त्यावर निदा डारने म्हटले की 'जर शाळा आणि कॉलेजात शक्य असेल तर त्यांच्या अभ्यासक्रमात क्रिकेटचाही समावेश केला पाहिजे. ग्रामीण भागातील आणि खेडेगावातील मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी शहरात जावे लागते. मात्र शाळेत किंवा महाविद्यालयात क्रिकेटचा समावेश केल्याने मुलींनादेखील क्रिकेटमध्ये करियर बनवता येईल.'

अब्दुल रझ्झाकची कॉमेंट

टॉक शोमध्ये अॅंकरने पुढे म्हटले की 'जेव्हा महिला खेळाडूंचे लग्न होते त्यानंतर त्या खेळणे थांबवतात. यावर डारने उत्तर दिले की महिला खेळाडूंना जितकी इच्छा असेल तितके त्या क्रिकेट खेळू शकतात. मात्र लग्नानंतर तुमचे ठाऊक नसते.' यावर अब्दुल रझ्झाकने कॉमेंट केली की 'अरे पण त्या लग्नच करत नाहीत. त्यांचे क्षेत्रच असे आहे. महिला जेव्हा क्रिकेटर बनतात तेव्हा पुरुषांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करतात. जर त्या पुरुषांपेक्षा चांगल्या खेळू शकत नसतील तर त्यांना हे सिद्ध करायचे असते की फक्त पुरुषच नाहीत तर महिला देखील चांगले खेळू शकतात. यामुळे लग्नाचा विचार मनातून निघून जातो.' यावर पुढे रझ्झाक म्हणाला,' 'डार यांनी काहीही केले तरी ती शेवटी महिलाच असेल.'

डारचे रझ्झाकला उत्तर

रझ्झाकच्या कॉमेंटवर निदा डारने उत्तर दिले की आमचे क्षेत्र असे आहे की 'आम्हाला जिममध्ये जावे लागते. आम्हाला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करायचे असते. त्यामुळे आम्हाला स्वत:ला फिट ठेवायचे असते.' यावर डारचा मुद्दा मध्येच तोडत रझ्झाक म्हणाला 'त्यांचा हेअरकट जसा आहे त्याला पाहून तुम्ही हे समजू शकता.' रझ्झाकचे बोलणे एकूण शो मधील सर्वजण हसत होते. त्यानंतर अॅंकरने पुढचा प्रश्न विचारला की टमाझ्या मनात हा प्रश्न खूप दिवसांपासून होता. तुम्ही लांब केसांसह क्रिकेट खेळू शकत नाही का? त्यावर डारने उत्तर दिले की 'आम्ही लांब केसांसह नक्कीच खेळू शकतो. मात्र ज्या खेळाडू लांब केस ठेवतात, त्यांच्या खेळावर याचा परिणाम होतो.' यावर दुसऱ्या अॅंकरने म्हटले की खेळाचा संबंध येतो, तेव्हा विविध गरजा असतात. कोणीही थ्री पीस सूट घालून का नाही खेळत? तुम्हाला खेळाच्या गरजेनुरूप खेळावे लागते.

सोशल मीडियावर अब्दुल रझ्झाकची धुलाई

अब्दुल रझ्झाक आणि निदा डार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी माजी पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू असलेल्या अब्दुल रझ्झाकवर दणकून टीका केली आहे. एका युजरने लिहिले आहे की 'हे किती वाईट आहे की सर्व लोक त्या महिलेवर तुटून पडले. महिलांना लिंगभेदासंदर्भात कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागे असेल याची कल्पनाही करवत नाही. निदा डार स्टार आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले आहे की 'आम्हाला माहित होते की अब्दुल रझ्झाक सेक्सिक्ट कॉमेंट करणाऱ्यांपैकी एक आहे. हा एक गटाराती किडा आहे. तो सतत निदा डारच्या विरोधात सेक्सिक्ट आणि महिलाविरोधी कॉमेंट करत होता की पुरुषांप्रमाणे महिला खेळाडूंचे लग्न होत नाही. त्यावर सर्वजण हसत होते. आमच्या महिला क्रिकेटर्सना सतत या समाजाला सहन करावे लागते.'

दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की 'माझ्या मनात मी लाईव्ही टीव्हीसंदर्भात निराश झाली आहे. निदाची काळजी करत मी अब्दुल रझ्झाक आणि इतर तिघांवर जोरात ओरडलो होतो जे तिच्या सेक्सिस्ट कॉमेंट करत होते.'

आणखी एका युजरने म्हटले आहे की 'अब्दुल रझ्झाक चांगला खेळाडू होता. निवृत्तीनंतर मात्र अब्दुल रझ्झाकचे टीव्हीवरील रुप चांगले नाही. कोणीतरी त्याला सांगितले पाहिजे की ही चेष्टा करण्याची गोष्ट नाही.'

एका युजरने तर कॉमेंट केली आहे की 'तू जागतिक पातळीवर ऑलराउंडर बनलास, मात्र तू जिथून करियर सुरू केले होतेस त्याच मानसिकतेत तू आहेस. पाकिस्तान महिला क्रिकेट स्टारची नॅशनल टीव्हीवर टिंगल करण्यासाठी तुझा धिक्कार आहे.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी