Viral Video | पाकिस्तानी पोलिसाचा रस्त्यावर मुलाचा लिलाव करताना व्हिडिओ प्रचंड व्हायरल, ५० हजारात घ्या मुलगा

Viral Video | हा व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानमधील आहे. अतिशय धक्कादायक हा व्हिडिओ पाकिस्तानातील सिंध प्रांतातील आहे. व्हिडिओतील पोलिस कर्मचारी सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्याचा रहिवासी आहे. तो जेल विभागातील कर्मचारी आहे. त्याची सध्याची आर्थिक स्थिती अशी झाली आहे की त्याला रस्त्यावर उभे राहून आपल्या दोन लहान लहान मुलांचा लिलाव करावा लागतो आहे. हे सर्वच प्रकरण गंभीर आहे.

Policeman selling boy Viral Video
पोलिस कर्मचारी मुलगा विकतानाचा व्हायरल व्हिडिओ  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानी पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल
  • ५० हजार रुपयांना रस्त्यावरच करत होता मुलाचा लिलाव
  • पाकिस्तानातील सिंध प्रांतातील धक्कादायक प्रकार

Viral Video | नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) सध्या अनेक व्हिडिओ, इमेजेस व्हायरल होत असतात. त्यातून जगभरातील चित्रविचित्र गोष्टी समोर येत असतात. शिवाय सोशल मीडियाचा वावर सर्वत्र असल्यामुळे असे फोटो किंवा व्हिडिओ (Viral Video) चटकन सर्वत्र पसरतातदेखील. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सध्या हा व्हिडिओ (Pakistan Policeman Viral Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये  पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये उभा असलेला एक माणूस (Policeman selling his children)आपल्या दोन मुलांनासोबत रस्त्यावर उभा आहे आणि तो लोकांना काहीतरी सांगतो आहे. या व्हिडिओला लोक मोठ्या प्रमाणात रीट्विट करत आहेत. या पोलिसाच्या बोलण्यावरून कळते आहे की तो त्या मुलांना ५०,००० रुपयांना विकण्याची बोली लावतो आहे. (Viral Video : Pakistani Policeman selling a boy on road, see the viral video)

पाकिस्तानातील सिंधमधील व्हिडिओ

समोर आलेल्या माहितीनुसार हा व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानमधील (Pakistan Viral Video)आहे. अतिशय धक्कादायक हा व्हिडिओ पाकिस्तानातील सिंध प्रांतातील आहे. व्हिडिओतील पोलिस कर्मचारी सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्याचा रहिवासी आहे. तो जेल विभागातील कर्मचारी आहे. त्याची सध्याची आर्थिक स्थिती अशी झाली आहे की त्याला रस्त्यावर उभे राहून आपल्या दोन लहान लहान मुलांचा लिलाव करावा लागतो आहे. हे सर्वच प्रकरण गंभीर आहे.

भ्रष्टाचाराने त्रस्त आहे हा पोलिस कर्मचारी

हा व्हायरल व्हिडिओ शेख सरमद नावाच्या व्यक्तीने त्याच्या ट्विटर हॅंडलवरून शेअर केला आहे. व्हिडिओत दिसत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव निसार लशारी सांगण्यात येते आहे. त्याचे म्हणणे आहे की तो जेल विभागाचा कर्मचारी आहे. या पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा आजारी आहे. मुलाचा इलाज करण्यासाठी त्याला सुट्टी हवी होती. या पोलिस कर्मचाऱ्याचे वरिष्ठ त्याच्याकडे सुट्टी देण्यासाठी लाच मागत आहेत. या पोलिस कर्मचाऱ्याने जेव्हा आपल्या वरिष्ठांना लाच दिली नाही तेव्हा त्याच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. इतकेच नाही या पोलिस कर्मचाऱ्याची म्हणजे निसार लशारी याची बदली तो सध्या असलेल्या शहरापासून १२० किलोमीटर दूर लरकाना शहरात करण्यात आली. तो आपल्या बॉसची तक्रारदेखील करू शकत नाही कारण त्याच्या बॉसचे वरपर्यत लागेबांधे आहेत.

व्हिडिओ मुळे निसार लशारीचा सुटला प्रश्न

आपल्याच विभागातील भ्रष्टाचारामुळे त्रस्त झालेल्या निसार लशारी याने नाइलाजाने ५०,००० रुपयांना आपल्या आजारी मुलाची बोली लावण्यास सुरूवात केली. निसार लशारी आपल्याच मुलाचा लिलाव करत असल्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्याला याचा फायदा झाला. निसार लशारी याची कहाणी सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांच्यापर्यत पोचली. त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत निसारची बदली रद्द करत त्याची नियुक्ती घोटकी येथेच ठेवण्याचा आदेश दिला आहे. शिवाय त्याला मुलाच्या उपचारासाठी १४ दिवसांची सुट्टी देण्यासदेखील सांगितले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी