Lovers Video Viral: माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सध्या सोशल मीडियाचा बोलबाला आहे. सोशल मीडिया असा एक प्लॅटफॉर्म बनला आहे, की तिथे अबालवृद्ध फ्रेंडली झाले आहे. सोशल मीडियावर केव्हा काय व्हायरल होईल हे, सांगता येत नाही. अशा कॉन्टेटमुळे काहींच मनोरंजन होतं तर काहीना मोठा मनस्ताप देखील सहन करावा लागत आहे. अशातच सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एक स्कूटी गर्ल तिच्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीसोबत रोमान्स करताना दिसत आहे.
आधी एक तरुणी स्कूटीजवळ उभी असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं. ती मित्राची वाट पाहत असल्याचं सगळ्यांना वाटतं. परंतु, अचानक एक वयस्कर व्यक्ती तिच्याजवळ येतो. दोघांमध्ये रोमान्स सुरू होतो. व्यक्ती तरुणीला आपल्या बाहुपाशात उचलून घेतो आणि स्कूटीच्या सीटवर बसवतो. तो तिला आलिंगन घेत असतानाच हा प्रकार शेजारी राहणाऱ्यांच्या निदर्शनास येतो. काही लोक छतावरून रोमान्स करणाऱ्या प्रेमीयुगुलाच्या अंगावर पाणी फेकतात. प्रेमीयुगुल तिथून पळ काढतात, असं व्हिडीओमध्ये दिसतं.
प्रेमीयुगुलाची झालेली फजिती पाहून सोशल मीडिया यूजर्स देखील भन्नाट रिएक्शन देताना दिसत आहे. flowfun नामक इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखों व्ह्यूज मिळाले असून लाईक्सचा अक्षरश: पाऊस पडत आहे.