video: घश्यात खाणे अडकताच मुलाचे झाले खूप हाल, असे वाचवले प्राण

व्हायरल झालं जी
Updated Nov 18, 2021 | 16:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

viral video: सोशल मीडियावर एक हैराणजनक व्हिडिओ समोर आला आहे. यात एका मुलाच्या घश्यात चिकन सँडविच खाताना हाड अडकते. सीसीटीव्ही फूटेजचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

viral video
घश्यात खाणे अडकताच मुलाचे झाले खूप हाल, असे वाचवले प्राण 
थोडं पण कामाचं
  • व्हायरल झालेल्या या व्हिडिओत जोसेफ रेनहार्टने एका स्थानिक रेस्टॉरंटमध्ये मुलाचे प्रा वाचवले.
  • क्लिपमध्ये मुलाच्या घश्यात  चिकनच्या हाडाचा तुकडा अडतो.
  • हा मुलगा रेस्टॉरंटमध्ये चिकन सँडविच खात असतो.

मुंबई: सोशल मीडिया(Social media) हा असा एक प्लॅटफॉर्म आहे ज्यावर काहीही आले तरी व्हायरल होऊन जाते. इंटरनेटवर(internet) अनेक मजेशीर आणि हादरवणारे व्हिडिओज पाहायला मिलतात. अशातच एक व्हिडिओ समोर आला आहे. जो खूप धोकादायक आहेच मात्र भयानकही आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक व्यक्तीचे प्राण जाता जाता वाचतात. हा व्हिडिओ एका रेस्टॉरंटमधील आहे. याचा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजचा असून तो व्हायरल झाला आहे. हा भयानक व्हिडिओ YouTube चॅनेल व्हायरल हॉगवर पोस्ट करण्यात आला होता. कॅप्शननुसार ही घटना अमेरिकेच्या विस्कॉन्सिन मधील ऑगस्टची आहे. viral video show man how to save boys life

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत जोसेफ रेनहार्टने एका स्थानिक रेस्टॉरंटमध्ये मुलाचे प्रा वाचवले. क्लिपमध्ये मुलाच्या घश्यात  चिकनच्या हाडाचा तुकडा अडतो. हा मुलगा रेस्टॉरंटमध्ये चिकन सँडविच खात असतो. याच दरम्यान त्याच्या गळ्यात चिकनच्या हाडाचा तुकडा अडकतो. व्हिडिओत जोसेफ रेनहार्टने त्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि अखेरीस तो यात यशस्वी होतो. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

व्हिडिओ शेअर करताना पेज अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले की, जोसेफ रेनहार्ट एक स्थानिक बार आणि रेस्टॉरंटमध्ये एका मुलाचे प्राण वाचवतो. कोणत्याही प्रशिक्षिणाशिवाय त्या व्यक्तीने चिकन सँडविचचा एक मोठा तुकडा बाहेर काढला. व्हिडिओत दिसल असलेली महिला त्या मुलाची आई असून ती आपल्या मुलाचा जीव वाचताना पाहत आहे. व्हिडिओत पाहत असलेली दुसरी महिला ९११वर कॉल करत आहे. मुलगा पूर्णपणे ठीक असून आणि तो पुन्हा सँडविच खाताना दिसत आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी