Viral Video: अद्भूत, एका हाताने बनवली 15 छायाचित्रे, गरीब मुलीचे टॅलेंट पाहून व्हाल थक्क, नाव गिनिज बुकात दाखल  

Girl Make 15 Sketches Together: उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील या मुलीचे टॅलेंट पाहून कौतुक केले आहे. आनंद महिंद्रा यांनी या मुलीच्या कलेला चमत्कार म्हटले आहे. यासोबतच त्यांनी मुलीला शिष्यवृत्ती देणार असल्याचे म्हटले आहे.

viral video sketches of 15 great men made together with one hand gunniss world set from up Girl read in marathi
Viral Video: अद्भूत, एका हाताने बनवली 15 छायाचित्रे 
थोडं पण कामाचं
  • या जगात अनेक प्रतिभावान लोक आहेत.
  • काही लोकांची प्रतिभा इतकी जबरदस्त असते की, ते पाहून जगालाही आश्चर्य वाटते.
  • सध्या यूपीतील एका मुलीचे टॅलेंट जगात गाजत आहे.

Girl Make 15 Sketches Together: या जगात अनेक प्रतिभावान लोक आहेत. काही लोकांची प्रतिभा इतकी जबरदस्त असते की, ते पाहून जगालाही आश्चर्य वाटते. सध्या यूपीतील एका मुलीचे टॅलेंट जगात गाजत आहे. खरंतर या मुलीने एका हाताने 15 महापुरुषांचे स्केच बनवून सर्वांना चकित केले आहे. बिझनेसमन आनंद महिंद्रा देखील या मुलीचे टॅलेंट पाहून कौतुक करत आहेत. आनंद महिंद्रा यांनी या मुलीला 'टॅलेंटेड आर्टिस्ट' म्हटले आहे. (viral video sketches of 15 great men made together with one hand gunniss world set from up Girl read in marathi)

अधिक वाचा : ​पैसे नाहीत म्हणून स्वतःच झाला डॉक्टर, केले अघोरी उपाय

15 महापुरुषांचे एकत्रित चित्र

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये एका मुलीने लाकडी चौकट बनवून 15 पेन अशा प्रकारे बांधले आहेत की ते एकत्र चालतील. यानंतर मुलगी व्हाईटबोर्डवर स्केच करू लागते. तुम्ही बघू शकता की मुलीने काही मिनिटांत 15 वेगवेगळ्या महापुरुषांचे एकत्र चित्र काढले. मुलगी स्केच करत राहते आणि शेवटी येणारा निकाल पाहून लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाही. व्हिडिओ पहा-

या मुलीने भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, लाल बहादूर शास्त्री, राणी लक्ष्मीबाई, डॉ. राजेंद्र प्रसाद यांसारख्या महापुरुषांची स्केचेस एकत्रितपणे तयार केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. .

अधिक वाचा : Local Train fight: मुंबई लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी, उपटल्या झिंज्या, व्हिडिओ होतोय व्हायरल

या मुलीचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. मुलीने अशक्य काम शक्य करून दाखवले आहे. नूरजहाँ असे या मुलीचे नाव आहे.

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'हे कसे शक्य आहे? साहजिकच ती प्रतिभावान कलाकार आहे. परंतु एकाच वेळी 15 चित्रे काढणे हे कलेपेक्षा बरेच काही आहे. हा चमत्कार आहे!' आनंद महिंद्रा यांनी असेही सांगितले की जर कोणी मुलीच्या या यशाची पुष्टी केली तर तो तिला प्रोत्साहन देईल. मुलीला शिष्यवृत्ती आणि इतर प्रकारची मदत दिल्यास आनंद होईल, असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी