Snake Video : साप दिसला की भल्या भल्या माणसाला घाम फुटतो. पूर्वी साप दिसला की तो लोक त्याला मारून टाकायचे. आता लोक सर्पमित्रांना बोलवून त्या सापाला जंगलात सोडून देतात. असे असले तरी साप स्वतःहून हल्ला करत नाही. जेव्हा सापाला धोका वाटतो तेव्हा तो हल्ला करतो. असाच एक सापाचा हल्ला करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक काळा लांबसडक साप सरपट जात होता तेव्हा एका व्यक्तीने हा साप हात घेतला आणि साप त्या माणसाला चावला. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (viral video snake attack on man video viral on instagram and social media)
सापाला कधीच डिवचू नये असे आपल्याला लहानपणापासून सांगितले जाते. तरी काही लोक हातात साप घेऊन जिवाशी ख्ळ करतात. असाच एक घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एका काळा साप एक व्यक्ती हातात घेतो आणि हा साप हल्ला करतो. एका मुक्या जनावाराला त्रास देऊ नये अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.
सापाच्या हल्ल्यात व्यक्ती झाला जखमी
व्हिडीओमध्ये एक माणूस काळ्या लांबसडक सापाला पकडताना दिसत आहे. हा माणूस जेव्हा सापाला पकडतो तेव्हा साप हल्ला करतो. सापाच्या हल्ल्यात माणूस जखमी होतो. त्याच्या हातातून रक्त येतं तरी हा माणूस सापाला पकडतोय. तेव्हा परत साप त्याला चावतो. तेव्हा त्या माणसाचा हात रक्ताने माखतो. साप वारंवार चावत असूनही तो साप सोडत नाहिये. हा व्हिडीओ world_of_snakes या इन्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आल आहे. तसेच हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्या माणसाला नेटकरी ओरडताना दिसत आहेत.