Viral Video : भन्नाट बॅलन्स, डोक्यावर डोकं टेकवून दोघे असे चढले पायऱ्या 

viral video stunt video man climbs stairs while holding another : समतोल साधणे अर्थात बॅलन्स करणे कठीण आहे. पण दोन तरुणांनी परस्पर समन्वय राखत चक्क पायऱ्या चढण्याची किमया साधली.

viral video stunt video man climbs stairs while holding another
डोक्यावर डोकं टेकवून दोघे असे चढले पायऱ्या 
थोडं पण कामाचं
  • भन्नाट बॅलन्स, डोक्यावर डोकं टेकवून दोघे असे चढले पायऱ्या
  • दोन तरुणांचा भन्नाट स्टंट
  • स्टंटचा व्हिडीओ व्हायरल

viral video stunt video man climbs stairs while holding another : समतोल साधणे अर्थात बॅलन्स करणे कठीण आहे. पण दोन तरुणांनी परस्पर समन्वय राखत चक्क पायऱ्या चढण्याची किमया साधली. विशेष म्हणजे जमिनीवर स्थिर उभ्या असलेल्या तरुणाच्या डोक्यावर दुसऱ्या तरुणाने डोकं टेकवले. यानंतर शिर्षासन करत संपूर्ण शरीराचा भार डोक्याच्या मदतीने जमिनीवर उभ्या असलेल्याच्या डोक्यावर सोपवत दुसरा तरुण बॅलन्स करत होता. जमिनीवर उभा असलेला तरुण एकाचवेळी स्वतःचा आणि सहकाऱ्याचा भार सांभाळत बॅलन्स करत होता. यानंतर जमिनीवर असलेल्या तरुणाने एक एक करत पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. या पद्धतीने जमिनीवर पाय टेकवून असलेल्या तरुणाने सलग काही मिनिटे दुसऱ्या तरुणाचा भार सोसत पायऱ्या चढण्याची कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ बघून अनेकजण चक्रावले आहेत. डोक्याचा वापर करून एकाने दुसऱ्याचा भार सोसणे हेच कठीण आहे. पण व्हिडीओत दोन तरुण परस्पर समन्वय राखून हे कठीण काम सहज करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ बघून काहींच्या अंगावर काटा आला. 

ट्विटरमधूल काढलेल्या या कर्मचाऱ्याने लिहिली अशी भन्नाट पोस्ट, सोशल मीडियावर होतेय कौतुक

सात वर्षाच्या चिमुरड्याने बुटात घातले पाय...लागोपाठ आले सात हार्ट अटॅक...गमावला जीव

व्हिडीओत स्पष्ट दिसत डोक्याच्या मदतीने दुसऱ्याच्या शरीराचा भार सांभाळत पायऱ्या चढणारा एका मागून एक अनेक पायऱ्या चढून वरच्या दिशेने येत आहे. सलग अनेक पायऱ्या चढताना दोन्ही तरुणांनी उत्तम बॅलन्स साधला आहे. दोघेही त्यांची मोहीम पूर्ण करण्यात कमालीचे यशस्वी होताना दिसत आहे.

व्हिडीओत दिसणारा हा स्टंट अतिशय आव्हानात्मक आणि धोकादायक आहे. स्टंट करताना कळत नकळत झालेल्या चुकीमुळे दोन्ही तरुणांना गंभीर स्वरुपाची दुखापत होण्याचा धोका होता. पण या धोक्याचे भान राखत दोन्ही तरुणांनी पुरेशी खबरदारी घेतली. त्यांनी बॅलन्स सांभाळत स्टंट यशस्वी केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी