Viral Video : विद्यार्थ्याने शिक्षकाला चोपले

viral video teacher scolded for not bringing books to class then student beat the teacher in mathura : काही वेळा विद्यार्थी अतिरेकी उद्दामपणा करतात. ज्या शिक्षकाकडून मार्गदर्शन घ्यायचे त्यालाच अडचणीत आणतात किंवा त्रास देतात. अशीच एक घटना भारतात घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

viral video
Viral Video : विद्यार्थ्याने शिक्षकाला चोपले  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Viral Video : विद्यार्थ्याने शिक्षकाला चोपले
  • गणिताचे पुस्तक आणले नाही म्हणून शिक्षक विद्यार्थ्यावर चिडले
  • विद्यार्थ्याने गणिताच्या शिक्षकाला चोपले

viral video teacher scolded for not bringing books to class then student beat the teacher in mathura : शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते आदर्श समजले जाते. शिक्षक विद्यार्थ्यांना मार्दर्शन करतात, त्यांना प्रगतीचा मार्ग दाखवतात. योग्य काय आणि अयोग्य काय याचे दिशादर्शन करतात असे म्हणतात. पण काही वेळा विद्यार्थी अतिरेकी उद्दामपणा करतात. ज्या शिक्षकाकडून मार्गदर्शन घ्यायचे त्यालाच अडचणीत आणतात किंवा त्रास देतात. अशीच एक घटना भारतात घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

भारतातील एका शाळेत गणिताचा तास सुरू होता. विद्यार्थ्याने गणिताशी संबंधित वही पुस्तक आणले नव्हते. हा प्रकार लक्षात आल्यावर शिक्षक विद्यार्थ्यावर संतापले. विद्यार्थ्यावर रागावले. पण शिक्षकाच्या वर्तनाने विद्यार्थी संतापला. शिक्षक आपल्या भल्यासाठी सांगत आहेत हे विसरून विद्यार्थ्याने धक्कादायक वर्तन केले. या वर्तनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

गणिताच्या तासाला गणिताचे पुस्तक आणले नाही म्हणून शिक्षक विद्यार्थ्यावर चिडले. विद्यार्थी या प्रकाराने संतापला. त्याने आधी शिक्षकाशी वाद घातला. नंतर संबंधित विद्यार्थ्याने गणिताच्या शिक्षकाला चोपले. ही घटना शाळेच्या सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली. 

घटना उघड झाल्यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने ठामपणे शिक्षकाला पाठिंबा दिला. शिक्षकाचे वर्तन व्यवस्थित आहे पण विद्यार्थी चुकला आहे, अशी भूमिका शाळेच्या व्यवस्थापनाने घेतली. प्रकरण जास्त चिघळल्यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्याला कारण दाखवा नोटीस बजावली.

फाॅरेनच्या सूनेला रानात काम करताना बघून सासूला आवरेना हसू; एकदा पहाच Viral Video...

Viral Video : भन्नाट बॅलन्स, डोक्यावर डोकं टेकवून दोघे असे चढले पायऱ्या 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी