Viral: या व्यक्तीकडे आहे जगातील सर्वात मोठी Z प्लस सुरक्षा; सोबत असतो डझनहून अधिक कुत्र्यांचा ताफा 

व्हायरल झालं जी
Updated Jun 23, 2022 | 13:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Man Walks With Dogs Video । सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याची कोणीच कल्पना करू शकत नाही. काही व्हायरल होणारे व्हिडीओ हसवणारे असतात तर काही व्हिडीओ नेटकऱ्यांना विचार करण्यास भाग पाडतात.

Viral video This person has the world's largest Z Plus security
या व्यक्तीकडे आहे जगातील सर्वात मोठी Z प्लस सुरक्षा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याची कोणीच कल्पना करू शकत नाही.
  • या व्यक्तीकडे आहे जगातील सर्वात मोठी Z प्लस सुरक्षा.
  • सोबत असतो डझनहून अधिक कुत्र्यांचा ताफा.

Man Walks With Dogs Video । मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याची कोणीच कल्पना करू शकत नाही. काही व्हायरल होणारे व्हिडीओ हसवणारे असतात तर काही व्हिडीओ सर्वांना विचार करण्यास भाग पाडतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस एकाच वेळी डझनभर कुत्र्यांसोबत फिरताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच जण म्हणत आहेत की या व्यक्तीकडे जगातील सर्वात मोठी झेड प्लस सुरक्षा आहे. दरम्यान व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक-दोन नव्हे तर तब्बल डझनभर कुत्र्यांचा ताफा घेऊन ती व्यक्ती चालत आहे. सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत. (Viral video This person has the world's largest Z Plus security). 

अधिक वाचा : तरूण चाकू घेऊन घुसला पोलीस स्थानकात, ६ पोलीस गंभीर जखमी

जगातील सर्वात सुरक्षित व्यक्ती 

दरम्यान, व्हिडीओमध्ये कुत्र्यांची फौज पाहून नेटकरी खूप खुश होत आहेत. खर तर बहुतांश लोक कुत्रे पाळत असतात, परंतु वेळेअभावी त्यांना सकाळी आणि संध्याकाळी फिरायला घेऊन जातात. यासाठी ते अनेकदा आपल्या कुत्र्याला सकाळी आणि संध्याकाळी फिरवण्यासाठी खास व्यक्तीला कामावर ठेवतात. व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्तीही असेच करताना दिसत आहे. हा माणूस कुत्र्यांना फिरायला घेऊन बाहेर पडला आहे. त्या व्यक्तीसोबत एक-दोन नव्हे, तर डझनभर कुत्र्यांची फौज रस्त्यावर आली आहे.

व्हिडीओने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ 

या व्हिडीओला ट्विटरवर Buitengebieden या नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहे. कुत्र्यांची फौज असलेला माणूस पाहून तुम्ही म्हणाल की तो एखाद्या मोहिमेवर निघाला आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत 'वॉकिंग द डॉग्स असं कॅप्शन लिहिले आहे. हा ७ सेकंदाचा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. तुम्ही पाहू शकता की त्या माणसाने १२ हून अधिक कुत्र्यांचे दोर आपल्या हाताने पकडून ठेवले आहेत. हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की ७ सेकंदाचा हा व्हिडीओ अवघ्या काही तासात दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी