VIRAL VIDEO: पाहा, जगातील एकमेव थप्पड मारण्याची अनोखी स्पर्धा

व्हायरल झालं जी
Updated Apr 20, 2019 | 08:28 IST | टाइम्स नाऊ हिंदी

VIRAL VIDEO: जगात स्पर्धा कशाचीही असू शकते. मग ती खाण्याची असेल, एका पायावर उभं राहण्याच असेल किंवा झोपण्याची. रशियामध्ये मात्र, थप्पड मारण्याची अनोखी स्पर्धा होते आणि ती रशियन लोकांमध्ये खूप लोकप्रियही आहे.

Unique Slap competition in Russia
रशियात होते थप्पड मारण्याची स्पर्धा   |  फोटो सौजन्य: Twitter

मॉस्को: सोशल मीडियावर कधी, कुठं, कसला व्हिडिओ पहायला मिळेल काही सांगता येत नाही. ट्विटरवर सध्या असाच एक व्हिडिओ पहायला मिळतोय. ज्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्याला जोरात थप्पड मारताना दिसत आहे. विशेष म्हणजे, त्याचं भांडण नाहीये तर, एकमेकांना थप्पड लावण्याची ही स्पर्धाच आहे. या स्पर्धेत कोण विजय होतंय कोण पराभूत यापेक्षा ही स्पर्धा बघायला वेगळीच मजा येत आहे. त्यामुळेच बहुदा सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड लाईक्स आणि व्हूज मिळवतोय.

कोठे होते ही स्पर्धा?

या खेळात दोघेजण एकमेकांना जोरात थप्पड मारताना दिसत आहेत. यातून त्यांना ताकद कोणाकडे आहे हे ठरवायचं आहे. हा व्हिडिओ रशियातील स्पर्धेचा आहे. रशियामध्ये दर वर्षी सायबेरियन पॉवर शो होतो. त्यात ही थप्पड मारण्याची स्पर्धाही होते. या अनोख्या खेळाचे काही नियमही आहेत. हा खेळ त्या नियमांच्या कक्षेतच खेळावा लागतो. नियमानुसार, दोन खेळाडू एका टेबलासमोर आमने-सामने उभे केले जातात. त्यानंतर दोन्ही खेळाडूंना एकापाठोपाठ थप्पड मारण्याची संधी दिली जाते. दोघांना तोपर्यंत थप्पड मारायची आहे. जोपर्यंत समोरचा खेळाडू पराभव स्वीकारत नाही. खेळाचा एक नियम खूपच इंटरेस्टिंग आहे. तो म्हणजे, खेळाडूला कोणत्याही परिस्थितीत प्रतिस्पर्ध्याची थप्पड चुकवता येत नाही. समोरच्याशी लढूनच त्याला विजय मिळवता येऊ शकतो.

स्पर्धेचे काही इंटरेस्टिंग नियम

जो खेळाडू दीर्घकाळ समोरच्या व्यक्तीच्या थप्पडांचा सामना करून शकतो. तो विजेता ठरवला जातो. जोपर्यंत दोन खेळाडूंपैकी एक पराभव स्वीकारत नाही. तोपर्यंत या खेळाचा शेवट होत नाही. खेळाचा आणखी एक महत्त्वाचा नियम असा की, खेळाच्या शेवटाला कोणतीही मर्यादा नसली तरी, जर तुमच्यामध्ये थप्पड सहन करण्याची ताकद नसेल आणि तरी तुम्ही खेळण्याची इच्छा व्यक्त करत असला तर त्या खेळाडूला पराभूत मानले जाते. या अनोख्या खेळाचा व्हिडिओ ट्विटरवर खूप वेगाने शेअर होतोय. आतापर्यंत १२ हजार जणांनी या व्हिडिओला रिट्विट केले आहे.

कोण ठरला विजेता?

या व्हिडिओमध्ये वासिली कामोट्सकी हा खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूला जोरदार थप्पड मारताना दिसत आहे. या सामन्यात कामोट्सकी हा जास्त ताकदवान दिसत आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूच्या थप्पडचा त्याच्यावर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. कामोट्सकी दुसऱ्या थप्पडमध्येच प्रतिस्पर्ध्याला गारद केले आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, यंदा वासिली कामोट्सकी पुरुष थप्पड चैम्पियनशिपचे विजेता बनले आहेत. त्यांना ३० हजार रुबल (३२ हजार रुपये) रोख पारितोषिक मिळाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIRAL VIDEO: पाहा, जगातील एकमेव थप्पड मारण्याची अनोखी स्पर्धा Description: VIRAL VIDEO: जगात स्पर्धा कशाचीही असू शकते. मग ती खाण्याची असेल, एका पायावर उभं राहण्याच असेल किंवा झोपण्याची. रशियामध्ये मात्र, थप्पड मारण्याची अनोखी स्पर्धा होते आणि ती रशियन लोकांमध्ये खूप लोकप्रियही आहे.
Loading...
Loading...
Loading...