Viral Video: नवऱ्याचे हात-पाय बांधून बायकोने बेदम चोपला! 

Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला पुरुषाला काठीने मारहाण करताना दिसत आहे. पाहा नेमका हा व्हिडिओ आहे तरी काय. 

 wife tied husbands hand legs and beaten
Viral Video: नवऱ्याचे हात-पाय बांधून बायकोने बेदम चोपला!   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • पतीच्या दारुच्या व्यसनाला वैतागलेल्या पत्नीने केली बेदम मारहाण
  • पतीचे हात-पाय बांधून पत्नीने काठीने दिला चोप
  • सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ

मुंबई: दारुच्या व्यसनामुळे (Drinking Alcohol) आजवर अनेक कुटुंबं उद्धवस्त झाली आहेत. अनेकांनी आपला पैसा आणि कौटुंबिक सुख या एका व्यसनापायी गमावलं आहे. बऱ्याचदा अनेक घरातील पुरुष दारुच्या व्यसनामुळे आपल्या कुटुंबाला बराच त्रास देतात. ज्याचा सर्वाधिक त्रास हा घरातील महिलेला होतो. पण जेव्हा हा त्रास सहन करण्यापलीकडे जातो तेव्हा मात्र, घरातील महिलेच्या रागाचा स्फोट होतो आणि ती त्यानंतर जे पाऊल उचलते ते भयंकर असू शकतं. अशाच एका घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल (Viral Video) होत आहे. एक महिला काठीने एका पुरुषाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ती एका पुरुषाचे हात-पाय बांधून त्याला काठीने बेदम मारहाण केल्याचं दिसून येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार मारहाण (Beaten)करणारी महिला ही त्या व्यक्तीची पत्नी (Wife)आहे. पतीला (Husband) दारूचं प्रचंड व्यसन (Addiction) असल्यामुळे पत्नीने त्याला मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे. तथापि, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे स्पष्ट झालेलं नाही किंवा या घटनेची पुष्टी देखील झालेली नाही.

परंतु व्हिडिओ पोस्ट केलेल्या यूजरच्या मते, पत्नी आपल्या पतीच्या दारू व्यसनामुळे प्रचंड नाराज होती आणि रागाच्या भरात तिने हे पाऊल उचलले आहे. तिला आपल्या पतीला एकदाच धडा शिकवायचा होता. कारण अनेकदा या गोष्टीला विरोध करुन देखील तिचा पती दारूचं व्यसन सोडत नव्हता.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर होत आहे व्हायरल:

व्हिडिओ सौजन्य: ट्विटर-श्वान 卐卐@Ayravata

दरम्यान, सोशल मीडियावर अनेक जण आता हा व्हिडिओ शेअर करत आहेत. त्यामुळे तो बराच प्रमाणात व्हायरल झाला आहे. दुसरीकडे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कमेंटही करत आहेत की, ज्यांना दारुचं व्यसन आहे आणि ज्यांच्या पत्नींना प्रचंड राग येतो त्यांनी दारु पिणंच सोडून दिलं पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी