Viral Video: वाघाला घास भरवण्यासाठी उघडली बसची खिडकी, पाहा पुढे काय घडलं!

Tiger Shocking Video: वाघाचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.

viral video window of the bus opened to feed tiger will not believe in outcome
वाघाला घास भरवण्यासाठी उघडली बसची खिडकी, पाहा पुढे काय घडलं! 
थोडं पण कामाचं
  • बस चालक दिसला वाघासोबत मस्ती करताना
  • खिडकी उघडून वाघाला घास भरविण्याचा केला प्रयत्न
  • व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Tiger Viral Video: चर्चेत राहण्यासाठी लोकं आजकाल अशा काही गोष्टी करतात, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कधीकधी गोष्टी हास्यास्पद असतात, तर काही गोष्टींमुळे अक्षरश: घाम फुटतो. असे हजारो धक्कादायक व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

वाघ म्हटलं तरी अनेकांना धडकी भरते. अशा परिस्थितीत जेव्हा खराखुरा वाघ समोर आला तर आपली पाचावरच धारण बसेल. तेव्हा आपण विचार करु की, वाघापासून आपला जीव कसा वाचेल. पण, एखाद्या व्यक्तीचे धाडस पाहून तुम्हीही विचारात पडाल.

अधिक वाचा: Viral Video, मरता मरता वाचले दोघे

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती बसची खिडकी उघडून वाघाला आपल्या दिशेने कसा बोलावत आहे. ते दृश्य बघून एखाद्या राष्ट्रीय उद्यानाचा प्रसंग आल्यासारखे वाटेल. बस ड्रायव्हर एका काठीत मांसाचा तुकडा अडकवतो आणि त्याला आपल्या बाजूला बोलावतो. मांसाचा तुकडा पाहून वाघ त्याच्या दिशेने येतो. काही सेकंदात वाघ तो तुकडा चाटतो. मोठी गोष्ट म्हणजे या काळात वाघ ड्रायव्हरला कोणत्याही प्रकारे इजा करत नाही आणि कोणालाही त्रास देत नाही.

अधिक वाचा: चिखलात खेळल्या जाणाऱ्या या खेळाची होतेय जगभरात चर्चा, जाणून घ्या काय आहे कारण

वाघासोबत मस्ती

हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर 'the_amazing_tigers' नावाने शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचवेळी हा धक्कादायक व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

काही यूजर्स म्हणतात की, वाघाशी खेळणं हे प्रचंड धोकादायक ठरु शकतं. तर कोणी म्हणते की, जर वाघाने हल्ला केला असता तर त्याचा परिणाम खूप वाईट झाला असता. त्याचवेळी काही लोक बस चालकाला थेट मूर्ख म्हणत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी