Mumbai Bike Stunt Video: अपघात (accident)रोखण्यासाठी वाहतूक पोलीस (Traffic Police)जनजागृती (public awareness)करत असतात. अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो तर अनेकांना अपघातात अपंगत्व येत असते. तरी काही बहाद्दर अगाऊपणा करत बाईकवर स्टंट करत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात फक्त एकट्याने नाही तर त्याच्यासोबत दोन तरुणींनीही जीवघेणा स्ंटट केला आहे. हा व्हिडिओ पाहून वाहतूक पोलिसांच्या ( Traffic Police) डोळे चक्रावले आहेत. हा व्हिडिओ मुंबईतील आहे. या व्हिडिओत एक तरुण दोन तरुणींसोबत खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा : दर्दी परिणीति चोप्रा ,एक नाही अनेकवेळा तुटलंय दिल
13 सेकंदाच्या व्हिडिओत खतरनाक स्टंट
या 13 सेकंदाच्या व्हिडिओत एक तरुण खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. एका बाईकवर तिघेजण प्रवास करत आहेत. तिघांनाही हेल्मेट घातलेले नाही. या व्हिडिओत दोन तरुणी आणि एक तरुण दिसत आहे. तरुण बाईक चालवत आहे. एक तरुणी पुढे बसली आहे तर, दुसरी तरुणीने मागे बसली आहे. पुढे बसलेली तरुणीने तरुणाकडे आपला चेहरा केला आहे आणि त्याला मिठी मारली आहे.
अधिक वाचा : अरर्रर सारा खतरनाक! 8 गोष्टींवर लगाम लावत घटवलं 45 किलो वजन
तर दुसरी मुलगी तरुणाच्या मागील बाजूस बसली आहे. तिनेही तरुणाला पकडलं आहे. व्हिडिओनुसार तरुण भरधाव वेगाने बाईक चालवत आहे. धावत्या बाईकवर हा तरुण बाईकचे पुढचे चाक उचलून व्हिली मारताना व्हिडिओत दिसत आहे. तर, पुढे बसलेली मुलगी देखील मध्येच आपले हात सोडून देत आहे. मागची तरुणी याला घट्ट पकडून बसली आहे.
हा व्हडिओ मुंबईमधील आहे. वर्दळीच्या ठिकाणचा आहे. कारण मागे रस्त्यावर काम सुरू असल्याचे बॅरीगेट्स पहायला मिळत आहेत. भर रस्त्यात सुरु असलेली ही हुल्लडबाजी पाहून यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. @PotholeWarriors नावाच्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. हा व्हिडिओला 127.3k Views आले आहेत.
अधिक वाचा : लवकर वेट लॉस करण्यासाठी रताळं आहे फायदेशीर
हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना मुंबई पोलिसांना टॅग करण्यात आले होते. पोलिसांनी हा व्हिडिओ पाहून तात्काळ गंभीर्याने याची दखल घेतली. या व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणांबाबत कोणाकडे काही माहिती असल्यास, तुम्ही आम्हाला थेट DM करू शकता असा रिप्लाय पोलिसांनी दिला होता.
याप्रकरणी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांविरुद्ध आयपीसीच्या कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि 336 (जीव धोक्यात घालणे) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.