...म्हणून Viral झाली लग्नाची आमंत्रण पत्रिका

Viral : wedding invite printed on a medicine leaf : आपल्या लग्नाची दीर्घकाळ चर्चा व्हावी यासाठी काहीजण मुद्दाम अनोखे प्रयोग करतात. असाच एक प्रयोग एका जोडप्याने केला.

Viral : wedding invite printed on a medicine leaf
...म्हणून Viral झाली लग्नाची आमंत्रण पत्रिका  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ...म्हणून Viral झाली लग्नाची आमंत्रण पत्रिका
  • गोळ्यांच्या पाकिटासारखी दिसणारी आमंत्रणाची पत्रिका
  • फार्मासिस्टने स्वतःच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी ही अनोखी पद्धत वापरली

Viral : wedding invite printed on a medicine leaf : आपल्या लग्नाची दीर्घकाळ चर्चा व्हावी यासाठी काहीजण मुद्दाम अनोखे प्रयोग करतात. असाच एक प्रयोग एका जोडप्याने केला. या जोडप्याने त्यांच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका अभिनव पद्धतीने छापून घेतली. सध्या ही लग्नाची आमंत्रण पत्रिका Viral (व्हायरल) होत आहे. । व्हायरल झालं जी

औषध म्हणून दिलेल्या गोळ्यांच्या पाकिटावर मागील बाजूस कंपनीविषयी आणि औषधाविषयी महत्त्वाची माहिती छापली असते. गोळ्यांच्या पाकिटावर मागील बाजूस माहिती छापण्यासाठी सर्व कंपन्या साधारण एकसारखी पद्धत वापरतात. यामुळे विशिष्ट रंगातील अक्षरे आणि विशिष्ट आकारातील अक्षरे बघून हे औषध म्हणून दिलेल्या गोळ्यांचे पाकीट आहे हे लगेच लक्षात येते. व्हायरल होत असलेली लग्नाच्या आमंत्रणाची पत्रिका ही अशाच स्वरुपाची रचना करून छापली आहे. यामुळे प्रथमदर्शनी आमंत्रणाची पत्रिका आहे की गोळ्यांच्या पाकिटावरील माहिती असा गोंधळ होतो.

कोरोना काळात औषधांना महत्त्व आले. हीच बाब डोक्यात ठेवून जोडप्याने गोळ्यांच्या पाकिटासारखी दिसणारी आमंत्रणाची पत्रिका छापली आहे. यात एझ्हिलारसन आणि वसंथकुमार (वसंतकुमारी) यांचे लग्न ५ सप्टेंबर रोजी असल्याची माहिती छापली आहे. लग्नाची आणि स्वागत सोहळ्याची तारीख तसेच वेळ छापली आहे. सोहळा कोणत्या ठिकाणी आहे ही माहिती पण दिली आहे. नातलगांना लग्नाचे आमंत्रण या पत्रिकेच्या माध्यमातून दिले आहे. एका फार्मासिस्टने स्वतःच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी ही अनोखी पद्धत वापरली आहे. हे अनोखे आमंत्रण व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी