Virat Kohli : विराट कोहली विकतोय मक्याची कणसं? जाणून घ्या व्हायरल फोटो मागील सत्य

Virat Kohli सोशल मीडियावर काही ना काही व्हायरल होत असतं. त्यामुळे अनेकवेळा गोंधळ उडतो आणि लोकांची हसून पुरेवाट होते. काही व्हिडीओ आणि फोटोमधून लोकांचा गोंधळ होतो, जेव्हा त्यातील सत्य बाहेर आल्यानंतर लोक हरखून जातात.

थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर काही ना काही व्हायरल होत असतं.
  • काही व्हिडीओ आणि फोटोमधून लोकांचा गोंधळ होतो
  • विराट कोहली विकतोय मका

Virat Kohli : सोशल मीडियावर काही ना काही व्हायरल होत असतं. त्यामुळे अनेकवेळा गोंधळ उडतो आणि लोकांची हसून पुरेवाट होते. काही व्हिडीओ आणि फोटोमधून लोकांचा गोंधळ होतो, जेव्हा त्यातील सत्य बाहेर आल्यानंतर लोक हरखून जातात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून लोक गोंधळले आहेत. एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक व्यक्ती मक्याच कणीस विकत असून ही व्यक्ती क्रिकेटर विराट कोहली असल्याचे लोक समजत आहेत. परंतु जेव्हा निरखून हा फोटो पाहिला असता सत्य समोर आले आहे. (virat kohli selling corn viral photo on social media)

जगात एकाच चेहर्‍याचे ७ लोक आहेत असे म्हटले जाते. अनेकवेळा सारखे दिसणारेही लोकही आपल्या निदर्शनास येतात. सेलिब्रिटींसारख्या दिसणार्‍या लोकांचे फोटो व्हायरल होत असतात. आता क्रिकेटर विराट कोहलीसारखा दिसण्यार्‍या व्यक्तीचा एक फोटो व्हायरल होत आहे. फनी सिंह या पेजवरून एक फोटो शेअर करण्यात आला आहे. विराट कॉर्नली असे या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे. हा फोटो व्हायरल झाला असून नेटकर्‍यांनी विराट कोहलीची मस्करी करण्यास सुरूवात केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी