Rs 10 Note Viral Again | मुंबई : सध्या एक १० रूपयांची नोट खूप चर्चेचा विषय बनली आहे. ज्यावर लिहले होते की, "विशाल माझे लग्न २६ एप्रिलला आहे, मला इथून पळवून घेऊन जा. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तुझी कुसुम." दरम्यान ही नोट व्हायरल झाल्यानंतर लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावरील युजर्स काही हास्यास्पद प्रतिक्रिया देत आहेत. त्यातील एक म्हणजे एका युजर्सने म्हटले की, भाऊ कुसुमचा हा मेसेज लग्नाआधी विशालपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून तो तिला २६ एप्रिलपूर्वी पळवून घेऊन जाईल. ही नोट व्हायरल होताच ट्रेंड बनत गेली तेवढ्यात आता विशालचेही उत्तर आले आहे. (Vishal gets Kusum's message 10 rupee note goes viral again).
अधिक वाचा : राज्यात पुढील ५ दिवस वाहणार भयंकर उष्णतेची लाट
लक्षणीय बाब म्हणजे सोशल मीडियावर मागील दोन आठवड्यांपासून रणबीर-आलियाच्या लग्नाची चर्चा जोरदार रंगली होती. मात्र आता युजर्संना रणबीर-आलियाच्या भेटीपेक्षा विशाल आणि कुसुमच्या भेटीची उत्सुकता लागली आहे. प्रत्येक नेटकरी विशालच्या कुसुमला भेटवण्यासाठी आला आहे हे दिसून येते. जर तुम्हाला अद्याप त्यांची भन्नाट लव्ह स्टोरी समजली नसेल तर पहिली समजून घ्यावी लागेल.
काही दिवसांपूर्वी कुसुमने तिचा प्रियकर विशालसाठी १० रूपयांच्या नोटेवर एक मेसेज लिहला होता. तो मेसेज सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. दरम्यान आता ट्विटरवर १० रूपयांच्या नोटेचे आणखी काही फोटो समोर आले आहेत. विशालने कुसुमला पाठीमागे निळ्या पेनने लिहून मेसेज लिहून उत्तर दिले आहे.
विशालने चिठ्ठिच्या माध्यमातून उत्तरात लिहले की, "कुसुम मला तुझा मेसेज मिळाला आहे, मी तुला घेण्यासाठी नक्की येईन. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझा विशाल." लक्षणीय बाब म्हणजे हे दोन्ही प्रेमी एकमेकांना भेटू शकतील की नाही हे पाहण्यासाठी सोशल मीडिया आता २६ एप्रिलची वाट पाहत आहे. जरी हे दोघे भेटले तरी विशालला त्याच्या कुसुमला दूर घेऊन जाता येईल का?
मात्र या स्टोरीमागील सत्य काय आहे याबाबत कोणालाच काहीच माहित नाही. खरंच कोण कुसुम आहे का, जिने तिचा प्रियकर विशालला नोटेवरून मेसेज लिहला आहे. का फक्त हे व्हायरल करण्यासाठी कंटेट बनवला आहे याबाबत कोणालाच कल्पना नाही. मात्र यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.