धक्कादायक Video! पतीशी झालेल्या वादानंतर महिलेने ९व्या मजल्यावरून मारली उडी, लोकांनी केली कमाल

यूपीच्या गाझियाबादहून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, हे पाहून तुमचे हृदयाचा थरकाप होईल पतीशी झालेल्या वादानंतर एका महिलेने  नवव्या मजल्यावरून उडी मारली.

watch Shocking video ghaziabad woman jumps from 9th floor neighbours rush to rescue with mattresses
पतीशी झालेल्या वादानंतर महिलेने ९व्या मजल्यावरून मारली उडी  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • यूपीच्या गाझियाबादहून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे
  • हे पाहून तुमचे हृदयाचा थरकाप होईल पतीशी झालेल्या वादानंतर एका महिलेने  नवव्या मजल्यावरून उडी मारली.
  • पतीने आरडाओरडा केल्यानंतर संपूर्ण सोसायटीत खळबळ उडाली

गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका महिलेचा तिच्या नवऱ्याशी वाद होता आणि हा वाद इतका वाढला की महिलेने नवव्या मजल्यावरून उडी मारली. हे प्रकरण विजयनगरमधील क्रॉसिंग रिपब्लिक येथे असलेल्या सेव्हियर सोसायटीशी संबंधित आहे. इथल्या नवव्या मजल्यावर राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये भांडण झाली आणि वाद वाढताच पत्नीने उडी मारण्याचा प्रयत्न केला पण महिलेने रेलिंगमधून उडी मारताच पतीने तिचा हात धरला आणि आरडाओरडा केला. 

लोकांनी इमारतीखाली टाकल्या होत्या गाद्या 

पतीने आरडाओरडा केल्यानंतर संपूर्ण सोसायटीत खळबळ उडाली आणि लोक घराबाहेर पडले. दरम्यान, सर्व लोकांनी घरून गाद्या काढून त्यांना खाली ठेवल्या. त्याच वेळी, पती पत्नीला रेलिंगच्या वर खेचण्याचा प्रयत्न करीत राहिला, त्याने सुमारे अर्धा तास प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही आणि पत्नीचा हाच सुटला. हात सोडताच बायको खाली पडलेल्या गादीवर पडली. सुदैवाने ही महिला वाचली, तरी काही जखमी झाल्यावर महिलेला नोएडाच्या खासगी रुग्णालयात दाखल केले गेले.

नवरा-बायकोमध्ये भांडण

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर पोलिसांनी अद्यापपर्यंत या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणीही याप्रकरणी तक्रार दाखल केलेली नाही परंतु व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची स्वत: दखल घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फाराज हसन त्याची पत्नी सादियासोबत नवव्या मजल्यावर राहतो आणि मंगळवारी या दोघांमध्ये वाद झाला, त्यानंतर पत्नीने हे पाऊल उचलले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी