Viral Video: ऐकलं का! देशी कोंबडा देतोय विदेशी बांग, पाहा व्हिडीओ

व्हायरल झालं जी
Updated Jun 02, 2022 | 14:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rooster Viral Video । पूर्वी लोक पहाटे कोंबडा आरावला की उठायचे. मात्र बदलत्या काळानुसार कोंबड्याची जागा घड्याळाने घेतली. कारण आता लोक घड्याळात अलार्म लावूनच उठतात. मात्र काही ठिकाणी आजही कोंबड्याचा आवाज ऐकूनही लोक जागे होतात.

Watch the video of the cock singing in a unique way
देशी कोंबडा देतोय विदेशी बांग, पाहा भन्नाट व्हिडीओ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पूर्वी लोक पहाटे कोंबडा आरावला की उठायचे.
  • बदलत्या काळानुसार कोंबड्याची जागा घड्याळाने घेतली.
  • सध्या कोंबडा भन्नाट स्टाईलमध्ये गातानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Rooster Viral Video । मुंबई : पूर्वी लोक पहाटे कोंबडा आरावला की उठायचे. मात्र बदलत्या काळानुसार कोंबड्याची जागा घड्याळाने घेतली. कारण आता लोक घड्याळात अलार्म लावूनच उठतात. मात्र काही ठिकाणी आजही कोंबड्याचा आवाज ऐकूनही लोक जागे होतात. कोंबडा आरवताच लोकांना समजते की सकाळ झाली आहे. काही प्रमाणात कोंबड्याचा आवाज बांगेशी जुळतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कोंबड्याचा आवाज ऐकून लोक चक्रावून गेले आहेत आणि त्याला विदेशी बांग म्हणत आहेत. (Watch the video of the cock singing in a unique way). 

अधिक वाचा : सौरव गांगुलीची आणखी एक पोस्ट चर्चेत, म्हणाले...

दरम्यान, आजपर्यंत तुम्ही कोंबड्याचे अनेक अंदाज पाहिले असतील. पण या व्हायरल व्हिडीओतील कोंबड्याचा अनोखा अंदाज पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की कोंबडा विचित्र आवाजात कसा गात आहे. कोंबडा एका वेळी इतका मोठा आवाज करतो की तो खूप थकतो आणि थकून जमिनीवर पडतो. मग अचानक शांत होतो. कोंबड्याचा हा अंदाज पाहून सगळेच थक्क झाले आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळीकडे शेअर करत आहेत. 

कोंबड्याचा अनोखा अंदाज 

आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून लोक नेटकरी या व्हिडीओचा प्रचंड आनंद घेत आहेत. ट्विटरवर '@TheFigen' नावाच्या अकाऊंटवरून हा मजेदार व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे सहा लाख लोकांनी हा मजेदार व्हिडीओ पाहिला आहे. तर या व्हिडिओला १६ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर ४,५०० हून अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. दरम्यान सोशल मीडियावरील काही युजर्स या कोंबड्याच्या साहाय्याने एकमेकांवर हास्यास्पद टिप्पणी करून आनंद लुटत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी