जगातील सर्वात उंच टॉवरजवळ लागली आग

Watch Video Fire In Skyscraper In Dubai Near Burj Khalifa Tallest Building In The World : जगातील सर्वात उंच टॉवर अशी 'बुर्ज खलिफा' या इमारतीची ओळख सांगितली जाते. या इमारतीच्या जवळच असलेल्या 35 मजली टॉवरमध्ये आग लागली.

Watch Video Fire In Skyscraper In Dubai Near Burj Khalifa Tallest Building In The World
जगातील सर्वात उंच टॉवरजवळ लागली आग  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जगातील सर्वात उंच टॉवरजवळ लागली आग
  • 35 मजली टॉवरमध्ये आग लागली
  • दुबईत घडली घटना

Watch Video Fire In Skyscraper In Dubai Near Burj Khalifa Tallest Building In The World : जगातील सर्वात उंच टॉवर अशी 'बुर्ज खलिफा' या इमारतीची ओळख सांगितली जाते. या इमारतीच्या जवळच असलेल्या 35 मजली टॉवरमध्ये आग लागली. ही घटना आज (सोमवार 7 नोव्हेंबर 2022) घडली. 

दुबईत 'बुर्ज खलिफा' जवळ असलेल्या एमार डेव्हलपर्सच्या '8 बुलेवॉर्ड वॉक' या 35 मजली टॉवरमध्ये आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. 

हिंदू, शिखांसाठी महत्त्वाची कार्तिक पौर्णिमा

Vastu Tips:पूजेच्या घरात चुकूनही ठेवू नका 'या' 6 गोष्टी, होतो त्याचा अशुभ परिणाम

Chandra Grahan 2022: चंद्रग्रहणात करा 'या' गोष्टींचे दान, सर्व दुःखातून मिळेल मुक्ती; लवकरच मिळेल मनासारखी नोकरी

'बुर्ज खलिफा' जवळ असलेल्या इमारतीत लागलेल्या आगीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. याआधी 2015 मध्ये 'बुर्ज खलिफा' जवळ एका महागड्या हॉटेलमध्ये आग लागली होती. तसेच चीनमध्ये चांग्शा शहरात 42 मजली इमारतीला आग लागली. याच इमारतीत चीनमधील एका टेलिकॉम कंपनीचे ऑफिस होते. ही आग कित्येक किलोमीटर दुरून पण स्पष्ट दिसत होती. आगीचे उंचच उंच लोळ आकाशाच्या दिशेने जात असल्याचे दिसत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी