Scorpion Attack In Egypt इजिप्तमध्ये विषारी विंचवांचा पूर

Watch Video Scorpion Attack In Egypt After Flooding And Snow In Southern Area Aswan वादळ आणि मुसळधार पाऊस यांचा तडाखा बसल्यानंतर आता इजिप्तमधील अस्वानमध्ये विषारी विंचवांचा पूर आला आहे.

Watch Video Scorpion Attack In Egypt After Flooding And Snow In Southern Area Aswan
इजिप्तमध्ये विषारी विंचवांचा पूर 
थोडं पण कामाचं
  • इजिप्तमध्ये विषारी विंचवांचा पूर
  • षारी विंचवाच्या डंखाने तासाभरात माणसांचा मृत्यू होत आहे
  • ३ मृत्यू, शेकडो नागरिक हॉस्पिटलमध्ये दाखल

Watch Video Scorpion Attack In Egypt After Flooding And Snow In Southern Area Aswan । कैरो (Cairo) : वादळ आणि मुसळधार पाऊस यांचा तडाखा बसल्यानंतर आता इजिप्तमधील अस्वानमध्ये विषारी विंचवांचा पूर आला आहे. एरवी वाळूत खोलवर जाऊन निवांत राहणारे विषारी विंचू बाहेर आले आहेत. रस्त्यांवर अनेक ठिकाणी विंचू वावरताना दिसत आहेत. विषारी विंचवाच्या डंखाने तासाभरात माणसांचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. शेकडो नागरिकांना विंचूदंश झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले आहे. आधीच वादळ आणि मुसळधार पावसामुळे त्रस्त असलेल्या अस्वानच्या प्रशासनासमोर विंचूदंश ही नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे. 

अस्वानमध्ये दरवर्षी एक इंच पावसाची नोंद होते. पण यंदा वादळ आले आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसला; अशी माहिती प्रशासनाने दिली. एरवी वाळूत तसेच खडकांच्या भेगांमध्ये अथवा इमारतीच्या भितींना गेलेल्या तड्यांमध्ये लपून विषारी विंचू दिवसभर आराम करतात. रात्री तापमान कमी झाले की विंचू बाहेर येतात. हे विंचू प्रामुख्याने पाल, लहना-मोठे किडे खातात. पण सध्या मुसळधार पावसामुळे मोठ्या संख्येने विषारी विंचू बाहेर आले आहेत. या विंचवांमुळे प्रशासनापुढे गंभीरक् प्रश्न निर्माण झाला आहे. 

इजिप्तमध्ये अरबी वंशाचे विषारी विंचू मोठ्या प्रमाणावर आढळतात. हे घातक विंचवांपैकी एक आहेत. या विंचवांच्या दंशाने लगेच त्रास होऊ लागतो. वेळेत उपचार मिळाले नाही तर तासाभरात मृत्यू होण्याचा धोका असतो. विषारी विंचवाने दंश करताच दंश केलेल्या ठिकाणी त्वचा लालसर होते. थोड्याच वेळात तिथेच प्रचंड सूज येते. ज्या ठिकाणी दंश झाला आहे तिथे त्वचेची आग होते. वेळेत उपचार मिळाले नाही तर विष वेगाने शरीरात पसरते आणि मृत्यू होतो. 

घातक असलेला इजिप्तचा अरबी वंशाचा विषारी विंचू पिवळ्या रंगाचा असतो. जाडी, हलक्या काळ्या रंगाची शेपटी या विंचवाला असते. रस्त्यांवर विषारी विंचू मोठ्या संख्येने वावरत असल्यामुळे प्रशासनाने अस्वानमधील सर्व डॉक्टर आणि मेडिकल स्टाफ यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. सर्वांना तातडीने ड्युटीवर हजर होण्यास सांगितले आहे. 

अस्वान विद्यापीठाच्या हॉस्पिटलमध्ये विषारी विंचवाचा दंश झाल्यामुळे तब्येत ढासळलेल्या ८९ जणांना दाखल केले आहे. शहरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलांमध्ये शेकडोंच्या संख्येने नागरिकांना दाखल केले आहे. अस्वानमधील सर्व हॉस्पिटलमध्ये विषारी विंचवाच्या दंशाने शरीरात भिनलेल्या विषावर उपाय करण्यासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा साठा तातडीने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. विषारी विंचवाच्या दंशानंतर सर्वात आधी माणसाच्या दृष्टीवर परिमाणा होतो, त्याला अंधुक दिसू लागते. यामुळे प्रशासनाने अस्वानमधील अनेक रस्त्यांवर वाहनांवर कडक बंधने लादली आहेत. तसेच काही भागांमध्ये वाहतूक बंदी केली आहे. वाहतुकीच्या निर्बंधांमधून अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सवलत देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी