helicopter crash video : ...असे क्रॅश झाले तालिबान्याने उडवलेले हेलिकॉप्टर

Watch Video Taliban Operated Helicopter Crash In Afghanistan Kandahar Province Troll On Social Media : अफगाणिस्तान सोडताना कोट्यवधी रुपयांची आधुनिक हेलिकॉप्टर अमेरिका तिथेच सोडून निघून गेली. ही हेलिकॉप्टर हाताळायची कशी याची माहिती नसल्यामुळे तालिबानची पंचाईत झाली आहे.

Watch Video Taliban Operated Helicopter Crash In Afghanistan Kandahar Province Troll On Social Media
...असे क्रॅश झाले तालिबान्याने उडवलेले हेलिकॉप्टर 
थोडं पण कामाचं
  • ...असे क्रॅश झाले तालिबान्याने उडवलेले हेलिकॉप्टर
  • व्हिडीओ व्हायरल
  • अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे कालबाह्य वर्तन

Watch Video Taliban Operated Helicopter Crash In Afghanistan Kandahar Province Troll On Social Media : काबुल : अफगाणिस्तान सोडताना कोट्यवधी रुपयांची आधुनिक हेलिकॉप्टर अमेरिका तिथेच सोडून निघून गेली. ही हेलिकॉप्टर हाताळायची कशी याची माहिती नसल्यामुळे तालिबानची पंचाईत झाली आहे. हेलिकॉप्टर असूनही ती वापरणे तालिबानसाठी अशक्य झाले आहे. या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी एका तालिबान्याने हेलिकॉप्टर उडवून बघण्याचा निर्णय घेतला. ही कृती त्याला भोवली. 

कंधारमध्ये तालिबानच्या सदस्याने हेलिकॉप्टरमधून उड्डाण केले. या सदस्याला उड्डाण तंत्राविषयी मर्यादीत माहिती होती. या अपुऱ्या माहितीच्या जोरावर त्याने हेलिकॉप्टर उडवण्याचा निर्णय घेतला. ही कृती त्याला आणि हेलिकॉप्टरचे उड्डाण बघणाऱ्यांना भोवली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंधारच्या काही भागांमध्ये पुराचे संकट आले आहे. या ठिकाणी मदतकार्यासाठी हेलिकॉप्टरमधून उड्डाण करण्याच्या निमित्ताने तालिबानच्या सदस्याने हेलिकॉप्टर सुरू केले. हे हेलिकॉप्टर हवेत उडू लागल्याचे पाहून काही जण उड्डाण बघण्यासाठी जमले. पण उड्डाण करुन जेमतेम ४० सेकंद झाली असताना तालिबान्याने हेलिकॉप्टरवरील नियंत्रण गमावले. हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या दुर्घटनेत हेलिकॉप्टर नष्ट झाले आणि ते हाताळणारा तालिबानचा सदस्य जखमी झाला. 

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तिथे डोकं बाजूला ठेवून अनेक आदेश दिले आहेत. दुकानांमधील मॉडेलच्या पुतळ्यांना मूर्ती समजून त्यांचा शिरच्छेद करण्याचा आदेश तालिबानने दिला आहे. आतापर्यंत अफगाणिस्तानमध्ये हजारो मॉडलेच्या पुतळ्यांचा शिरच्छेद झाला आहे. या घटनांशी संबंधित व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. 

लोकांना शस्त्रांचा धाक दाखवून अल्लाचे नाव घेण्याची सक्ती केली जात असल्याचे व्हिडीओ पण व्हायरल होत आहेत. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतला असला तरी २१ व्या शतकाला अनुरुप असा कारभार करण्याऐवजी तालिबान तिथे १६-१७व्या शतकातील मध्ययुगीन कायदे राबवत असल्याचे चित्र आहे. आधुनिक ज्ञानाचा, अनुभवाचा आणि कौशल्याचा अभाव असल्यामुळे तालिबान सातत्याने कालबाह्य वर्तन करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी