Viral Video : डॉगीच्या बुद्धिमत्तेचे कौतुक, हुशारीने खेळला व्हॉलीबॉल

watch viral video dog play volleyball with human people did hilarious comment on it : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक डॉगी (कुत्रा) व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहे.

watch viral video dog play volleyball with human people did hilarious comment on it
Viral Video : डॉगीच्या बुद्धिमत्तेचे कौतुक, हुशारीने खेळला व्हॉलीबॉल 
थोडं पण कामाचं
  • Viral Video : डॉगीच्या बुद्धिमत्तेचे कौतुक, हुशारीने खेळला व्हॉलीबॉल
  • व्हिडीओत तीन जणांसोबत एक डॉगी व्हॉलिबॉल खेळताना दिसत आहे
  • डॉगी व्हॉलिबॉल खेळताना

watch viral video dog play volleyball with human people did hilarious comment on it : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक डॉगी (कुत्रा) व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहे. डॉगीची हुशारी बघून अनेकांनी त्याचे कौतुक केले. व्हिडीओवर आलेल्या असंख्य प्रतिक्रिया डॉगीच्या हुशारीचे आणि त्याच्या चपळाईचे कौतुक करत आहेत. 

डॉगी अर्थात कुत्रा हा प्राणी अनेकांचा लाडका आहे. कित्येकांना कामाच्या व्यापातून बाहेर पडल्यावर लाडक्या डॉगीसोबत खेळणे, त्याच्यासोबत वेळ घालवणे आवडते. कित्येकजण त्यांच्या लाडक्या डॉगीला घरातील सदस्यासारखे व्यवस्थित प्रशिक्षित करतात. यामुळे प्राणी असूनही काही कामं डॉगी माणसांइतकीच किंवा त्यांच्यापेक्षा जास्त प्रभावीरित्या करतात. व्हायरल व्हिडीओत हाच प्रकार दिसत आहे.

Mumbai Crime News : दसर्‍याच्या दिवशी मुंबईत घडली धक्कादायक घटना, विशीतल्या तरुणीसोबत...

Bigg Boss Marathi Season 4: घरामध्ये प्रसादला सारखं केलं जातंय टार्गेट?

व्हिडीओत तीन जणांसोबत एक डॉगी व्हॉलिबॉल खेळताना दिसत आहे. डॉगी व्हॉलिबॉल खेळताना त्याच्यासोबत असलेल्या तीन जणांच्या कृती बघून आणि स्वतःच्या डोक्याचा सुरेख वापर करताना दिसत आहे.

व्हिडीओ बघून अनेकांनी डॉगीच्या कौशल्याचे कौतुक केले. कित्येंकानी तर फक्त डॉगीसाठी व्हिडीओ वारंवार बघणे पसंत केले. आपण पण हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी