Viral Video of Giant Python सगळ्यात सुरक्षित जागा म्हंटल्यावर घरच डोळ्यासमोर येते, पण जर घरच सुरक्षित नसेल तर तुम्ही काय करणार? हे ऐकायला तुम्हाला जरा विचित्र वाटले असेल, पण खरंच असे तुमच्याबरोबर झाले तर काय होईल, याचा कधी विचार केला आहे का? कारण, एका घरात असे घडले आहे, जे पाहिल्यानंतर तुम्ही शॉक होऊन जाल! viral video of Giant Python made its hideout in the roof of the House
अधिक वाचा : खरी आणि भेसळयुक्त चहापावडर ओळखण्याची ही आहे सोपी ट्रिक
वास्तवामध्ये, सोशल मिडियावर देखील हा व्हीडियो मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक महाकाय अजगर घरातच ठाण मांडून बसला होता. अशावेळी एका वन विभागाच्या कर्मचाऱ्याद्वारे त्याला तिथून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हा व्हिडीओ पाहताना आपल्या घरात जर असा अजगर राहत असता तर आपण काय केले असते, ह्या विचाराने अंगाला शहाराच येतो. इतका महाकाय अजगर तिथे पोहोचलाच कसा असा प्रश्न तुमच्या मनात येणे स्वाभावीकच आहे ! पण याहून महत्वाची गोष्ट अशी की, जर तुमच्या सभोवताली काही संशयास्पद गोष्ट नजरेसमोर आली किंवा त्याची जाणीव होत असेल तर तात्काळ वणविभागाच्या कर्मचाऱ्यांना याबद्दल सूचित करावे.
अधिक वाचा : Girish Bapat : भाजप खासदार गिरीश बापट यांचे पुण्यात निधन
इंस्टाग्राम वर व्हायरल होत असलेला हा व्हीडियो पाहिल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या व्हीडियोच्या खाली नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. त्यातील एकाने लिहिले की, आता मला छताचीसुद्धा भीती वाटू लागली आहे. तर दुसऱ्या एकाने म्हंटले आहे की, आता रात्री झोपताना सुद्धा भीती वाटेल. हा व्हीडियो 'bilal.ahm4d' नामक एका अकाऊंट वरुन शेयर करण्यात आला आहे.