Watch Viral Video : लग्नापूर्वी वधूने धरला हट्ट ! एंट्री म्युझिकसाठी बसली रूसून

लग्न मंडपात प्रवेश करण्यासाठी वधूने धरलेला हट्टाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये वधू आपल्या घरच्यांना सांगते की ती कोणत्याही गाण्यावर प्रवेश करणार नाही.

Watch Viral Video, The bride said that she would not come to the tent without playing the drum
Watch Viral Video : Watch Viral Video : लग्नापूर्वी वधूने धरला हट्ट ! एंट्री म्युझिकसाठी बसली रूसून ।   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • लग्नापूर्वी वधूने धरला हट्ट
  • म्हणाली, ढोल वाजल्याशिवाय मंडपात येणार नाही
  • एंट्री म्युझिकचा व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई : लग्नसोहळ्यात एंट्री म्युझिकची चांगलीच क्रेझ आहे. सर्व वऱ्हाडी मंडळींचे लग्नात वधूच्या एंट्रीकडे लक्ष लागलेले असते. त्यामुळे म्युझिकल एंट्री हा एक लग्नाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यासाठी अगोदरपासूनच नियोजन सुरू होते आणि ते लग्नाच्या दिवसापर्यंत सुरू असते. वधूने स्वतः प्रवेशावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी, आपण एका नववधूचा व्हिडिओ पाहिला असेल जिने तिच्या पसंतीचे गाणे वाजवले नाही तर लग्नात प्रवेश करण्यास नकार दिला. नंतर असे अनेक व्हिडिओ आले. पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्येही नववधू आपल्या आवडीचे म्युझिक वाजत नसल्याने मंडपात प्रवेश नाकारत आहेत.

अधिक वाचा : http://Toddler orders furniture : ऐकावं ते नवलच! लहान मुलाने आईच्या फोनवरून मागवले तब्बल १.४ लाख रूपयांचे फर्निचर

हट्टी वधू

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक वधू लग्नासाठी तयार असल्याचे दिसत आहे. तिच्या मेकअपला फायनल टच दिला जात आहे. दरम्यान, ती तिच्या वधूच्या प्रवेशाच्या गाण्याबाबत तिच्या कुटुंबातील सदस्यांना प्रश्न विचारते. व्हिडिओमध्ये तुम्ही वधूला 'मी कोणत्याही गाण्यात प्रवेश करणार नाही' असे म्हणताना ऐकू शकता. मला गाणं नको, मला तेच ढोल पाहिजे, त्याच ढोलावर मी प्रवेश करेन. यावर वधूचा भाऊ म्हणतो, 'भाऊ, यासाठी तुला मुलांशी बोलावे लागेल'. वधू म्हणते की 'मी बोलते'.


लोकांना हट्टीपणा आवडतो

नववधूच्या जिद्दीचा हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सना खूप पसंत केला जात आहे. हा व्हिडिओ पाहून लोक मजा घेत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला जवळपास 9200 लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर लोक अनेक मजेशीर कमेंटही करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर केला जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी